27.5 C
New York
Monday, June 17, 2024

Buy now

तुलसी शैक्षणिक समूहाचा अनोखा उपक्रम १४० विद्यार्थिनींना मोफत शिलाई मशीनचे वाटप

उद्योजक बनू पाहणाऱ्या विद्यार्थिनींना बँक अर्थसहाय्य करणार – कॅनरा बँक बीड शाखा व्यवस्थापक सतिष कुमार यांचे प्रतिपादन 

बीड प्रतिनिधी (महाराष्ट्र आरंभ):- बारावी पास झाल्यानंतर विद्यार्थिनींचा कल हा फॅशन डिझाईन कोर्स कडे वाढला आहे. उद्योजक बनण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. उद्योजक बनू पाहणाऱ्या विद्यार्थिनींना कॅनरा बँक अर्थसाह्य करून त्यांचे स्वप्न साकार करण्याचे प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन कॅनरा बँक बीड शाखा व्यवस्थापक सतिष कुमार यांनी केले.

येथील देवगिरी प्रतिष्ठान बीड संचलित तुलसी शैक्षणीक समुह बीड यांच्या वतीने दि.२० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता तुलसी इंग्लिश स्कुल बीड येथे मोफत शिलाई मशिन वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीड येथे बी. डिझाईन फॅशन डिझाईन या कोर्ससाठी प्रवेश घेतलेल्या १४० विद्यार्थिनींना यावेळी मोफत शिलाई मशीन वाटप करून संस्थेने अनोखा उपक्रम राबविला आहे. याप्रसंगी देवगिरी प्रतिष्ठान बीडचे संस्थापक अध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे, तुलसी शैक्षणिक समूहाच्या प्रेरणास्थान तुळसाबाई रोडे, कॅनरा बँक बीड शाखा व्यवस्थापक सतिष कुमार, निवृत्त, डिवायएसपी.सी.आर. रोडे, निवृत्त शिक्षणाधिकारी माऊली सोनवणे, श्रावस्ती शि.प्र. व बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अध्यक्ष जालना बाळासाहेब दांडगे, आर.डी.जोगदंड, प्रा.राम गायकवाड, तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय प्राचार्य डॉ. एल.एम.थोरात, तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन प्राचार्य डॉ.अशोक धुलधुले, तुलसी इंग्लिश स्कुल बीड प्राचार्य उमा जगतकर, नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन प्राचार्य डॉ.शैलेजा पैकेकर, मॉडर्न संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर प्राचार्य ज्योती मोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ.अस्मिता साळवे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अंकुश कोरडे यांनी केले. संस्थेने राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती त्यांनी यावेळी सांगितली.

याप्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे म्हणाले की, तुलसी शैक्षणिक समूहाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. यातून समाजाप्रती आपली नैतिकता आम्ही जोपासत आहोत . गोरगरीब आणि वंचित असलेल्या विद्यार्थिनीं उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे सांगत तुम्ही उद्योजक बना यातच माझा आनंद आहे असे प्रा.प्रदिप रोडे यांनी सांगितले. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जयश्री पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राचार्य डॉ.अशोक धुलधूले यांनी मानले. यावेळी तुलसी शैक्षणिक समूहातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थिनी यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या