10.6 C
New York
Tuesday, November 26, 2024

Buy now

spot_img
spot_img

श्री हनुमान जयंतीनिमित्त सेवागड सेलु येथे त्रिदिवसीय भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

समाज आणि जागरणासाठी समर्पित अभियान व सत्संग कथा सोहळा

गंपू भैय्या राठोड यांच्याकडून महापंगतीचे आयोजन

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार 

गेवराई दि.१९ प्रतिनिधी (नवनाथ आडे):- गेवराई तालुक्यातील सेवागड सेलु तांडा येथे श्री हनुमान जयंतीनिमित्त त्रिदिवसीय भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच समाज आणि राष्ट्र जागरणासाठी समर्पित अभियान असून सत्संग कथा सोहळ्याचे देखील सेवागड सेलु तांड्याच्या वतीने आयोजित केले आहे.

हा दैनिक कार्यक्रम सकाळी ६ वाजता प्रभात फेरी होऊन सकाळी ९ ते १२ सत्संग कथा होणार आहे. तसेच सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत हरिपाठ व रात्री ७ ते ९ वाजेपर्यंत हरिकीर्तन होणार आहे. आणि हा कार्यक्रम सलग तीन दिवस होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सत्संग कथा प्रवक्ते तथा महामंत्री अखिल भारतीय संत समीतीचे पूज्य स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज यांनी केले आहे. सेवागड सेलु तांड्याच्या विकासासाठी त्यांनी खूप कर्तव्यदक्ष तांड्याची सुधारणा केली आहे. गंपू भैय्या राठोड यांचे हे महाराज अत्यंत जवळचे मार्गदर्शक आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य श्री हनुमान जयंतीनिमित्त त्रिदिवसीय भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमानिमित्त दि.२३ एप्रिल रोजी अन्नदाते गंपू राठोड यांच्याकडून महापंगतीचे आयोजन केले आहे. सर्व भाविक भक्तांनी तसेच येणाऱ्या सर्व मान्यवरांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन गंपू भैय्या राठोड यांनी केली आहे.

या कार्यक्रमाला देव , देश, धर्म रक्षणाचे ज्वलंत आणि प्रखर विचार श्रवण करण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सेवागड सेलु तांड्याच्या ग्रामस्थांच्या वतीने केले आहे.                                     या कार्यक्रमाला लोकसभा निवडणुकीचे उमेदवार पंकजाताई मुंडे , बजरंग बप्पा सोनवणे व गेवराई तालुक्याचे आमदार लक्ष्मण पवार माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, शिवसेना युवा संघटक गेवराई तालुकाध्यक्ष पप्पू चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस चे सरचिटणीस रविकांत राठोड, बंजारा समाजाचे नेते पी.टी. चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब राठोड, मारफळा ग्रामपंचायतचे मेंबर नितीन राठोड, साई सेवा हाॅटेलचे संचालक सचिन जाधव यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते, समाज सेवक, सामाजिक कार्यकर्ते व‌‌ सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या