27.5 C
New York
Monday, June 17, 2024

Buy now

चकलांबा पोलिसांची वाळू तस्करावर मोठी कारवाई

हायवा, लोडर, ट्रॉलीसह एका ट्रॅक्टर वर कारवाई

47 लाख रुपयांचा मुद्द्यमाल केला जप्त 

गेवराई प्रतिनिधी (महाराष्ट्र आरंभ):- चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गोदावरी नदीपात्रात सुरळेगाव या ठिकाणी एक वाळू भरण्यासाठी वापरले जाणारे लोडर तसेच ट्रॉली सर ट्रॅक्टर हे वाळू भरणे कामी येणार आहे. त्याप्रमाणे ठाणे प्रभारी अधिकारी यांनी सापळा लावून सदर ठिकाणी रेड केली असता माहितीप्रमाणे एक ट्रॉली सह ट्रॅक्टर व लोडर मिळून आले. पोलिसांची चाहूल लागताच ट्रॅक्टर व लोडर वरील ड्रायव्हर पळून जाण्यात यशस्वी झाले. ट्रॅक्टर व लोडर जागीच जप्त करून पोलिसांनी ताब्यात घेतले असून ट्रॅक्टर व लोडर चालक मालकावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे.

त्यादरम्यान सुरळे गावाकडे जात असताना बिगर नंबरचा एक हायवा राक्षस भवन ते सुरळेगाव रस्त्यावरती रहदारीस अडथळा होईल अशा पद्धतीने मध्येच उभा राहिलेला मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणून मोटर वाहन कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत आहेत.

सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर साहेब, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नीरज राजगुरू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नारायण एक शिंगे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल खटाणे, पोलीस कॉन्स्टेबल सुरवसे पोलीस कॉन्स्टेबल पवळ, पोलीस कॉन्स्टेबल घोंगडे, चालक सानप आदींनी केली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या