लाखोंच्या देशी दारू सह गोमास व तीन मोटारसायकली जप्त
एक लाख 28 हजार 430 रुपयाचा मुद्देमाल जप्त; तीन आरोपी जेरबंद
गेवराई प्रतिनिधी (महाराष्ट्र आरंभ):- चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांना गोपनीय बातमीदारंद्वारे माहिती मिळाली होती की, गेवराई ते महार टाकळी रस्त्याने अवैध देशी दारू तसेच गोमास याची अवैध वाहतूक होणार आहे. त्यानुसार ठाणे प्रभारी अधिकारी यांनी वेगवेगळे पथके नेमणूक गोपनीय बातमी दाराच्या संपर्कात राहून वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅप लावला असता चेक पोस्ट पॉईंट अलर्ट केला असता व पेट्रोलिंग नेमली असता 1) खळेगाव येथील हॉटेल निवांत वर देशी विदेशी दारूचा 2800 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला त्याचा मालक कृष्णा वामन कांबळे राहणार खळेगाव यांच्याकडून जप्त करण्यात आला.2) उमापूर ते चकलांबा रोडवरील वाघमोडे पंपाजवळ एक एचएफ डीलक्स मोटरसायकल क्रमांक एम एच 23 बीबी 3390 हिच्यासह भगवान सिताराम रोकडे राहणार उमापुर तालुका गेवराई जिल्हा बीड देशी दारूचे तीन पॅक बंद बॉक्स घेऊन जाताना मिळून आला किंमत अंदाजे 45080 ते जागीच जप्त करण्यात आले.
3) शरद सुंदर कापसे रा उमापूर ता गेवराई जिल्हा बीड हा त्याचे हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल वरून देशी दारूच्या 240 बाटल्या घेऊन जाताना महार टाकळी चेक पोस्ट येथे पकडण्यात आला त्याच्याकडून मोटरसायकल सह 51 हजार 800 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
4) तसेच उमापूर ते महार टाकळी चेक पोस्ट दरम्यान पेट्रोलिंग चालू असताना जब्बार अहमद कुरेशी राहणार उमापूर तालुका गेवराई जिल्हा बीड हा त्याची मोटरसायकल एम एस 23 ए एल 4897 वरती 25 किलो गोमास घेऊन जाताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण 28 हजार 750 रुपयाचा मुद्यमाल जप्त करण्यात आला. त्याप्रमाणे पोलीस ठाणे चकलांबा येथे गुन्हा रजिस्टर नंबर 15/24,16/24,17/24, 18/24 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत पुढील तपास चकलांबा पोलिस करत आहेत
सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब अपर पोलीस अधीक्षक सचिन फोन कर साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ नीरज राजगुरू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नारायण एक शिंगे, पोलीस उपनिरीक्षक अनंता तांगडे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे, पोलीस उपनिरीक्षक कुमावत, पोलीस हवालदार अमोल येळे, पोलीस हवालदार पवार, पोलीस कॉन्स्टेबल घोंगडे, पोलीस कॉन्स्टेबल किरण मिसाळ, पोलीस कॉन्स्टेबल पवळ, पोलीस कॉन्स्टेबल सुरवसे, पोलीस कॉन्स्टेबल खटाणे यांनी केली