9.8 C
New York
Saturday, November 9, 2024

Buy now

spot_img
spot_img

नमस्‍कार ! २६ एप्रिल च्‍या मतदानाच्‍या एसटीमध्‍ये सर्वांनी स्‍वार व्‍हा 

नमस्‍कार ! २६ एप्रिल च्‍या मतदानाच्‍या एसटीमध्‍ये सर्वांनी स्‍वार व्‍हा

 

*सीईओ यांच्‍या आवाजातील उद्घोषणेने नांदेड बसस्‍थानकावरील प्रवाशी स्तिमित*

 

*मनपा आयुक्‍त डॉ. डोईफोडे यांनी लोकशाहीच्‍या बसमध्‍ये मतदान करुन स्‍वार होण्‍याचे केले आवाहन*

 

*नांदेड बसस्‍थानकावर स्‍वीप अंतर्गत जनजागृतीला प्रवाशांचा प्रतिसाद*

अनंतोजी कालीदास

नांदेड, दि. १५ : बसस्‍थानकावरील ‘फलाट क्रमांक १ वर लागलेली गाडी …..’, अमूक या गावाला जाणार असल्‍याची नेहमीची सूचना ऐकण्‍याची सवय असणा-या प्रवाशांना आज सकाळी १०.१५ वाजताच्‍या सुमारास वेगळ्या आवाजात वेगळी सूचना ऐकायला मिळाली. सूचना होती… लोकशाहीच्‍या बसमध्‍ये बसताना मतदानाची तिकिट काढण्‍यासाठी, आपल्‍या पसंतीच्‍या उमेदवाराला २६ एप्रिलला मतदान करण्‍यासाठी विसरु नका !

 

जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे हे जिल्‍हास्‍तरीय स्‍वीप समीतीचे प्रमुख आहेत. आज या उपक्रमांतर्गत जनतेचे प्रबोधन करण्‍यासाठी दोन्‍हीही अधिका-यांनी सकाळीच बसस्‍थानक गाठले. सकाळी जवळपास तासभर स्‍वीपची समिती आणि हे दोनही अधिकारी बसस्‍थानकावरील विविध उपक्रमामध्‍ये सहभागी झालेत.

 

आज सकाळी नांदेडच्‍या मध्‍यवर्ती बसस्‍थानकावर उभय अधिका-यांनी ‘मी मतदान करणार’ या सेल्‍फी पॉईंटचे उद्घाटन केले. त्‍यानंतर त्‍यांनी नांदेड जिल्‍ह्यातील अनेक बसेसवर स्टिकर चिटकवून प्रचार मोहिमेत सहभाग घेतला. २६ एप्रिलला प्रत्येक नागरिकांनी मताधिकार बजावावा , असे आवाहन यामध्ये करण्यात आले आहे.

 

नांदेड जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांच्‍या मार्गदर्शनात यावर्षी ८० टक्‍के मतदानाचे उद्दिष्‍ट जिल्‍ह्यामध्‍ये ठेवण्‍यात आले आहे. त्‍याअंतर्गत लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्‍यापुर्वीपासून जिल्‍ह्यामध्‍ये वेगवेगळे उपक्रम राबविण्‍यात येत आहे. सर्व महाविद्यालयीन तरुणांना यामध्‍ये सहभागी करण्‍यात आले आहेत. याशिवाय ८ मार्च ला जागतिक महिला दिनी महिला रॅली काढून जनजागृती करण्‍यात आली होती. त्‍यानंतर युवकांमध्‍ये स्‍पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबतच मतदान जनजागृती अभियान राबविण्‍यात आले. यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला. याशिवाय उमेदच्‍या २ लाख महिलांसोबत एकाचवेळी शपथ आणि संवाद, महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांशी संवाद असे विविध उपक्रम जिल्‍ह्यामध्‍ये सुरु आहे. त्‍याला उत्‍तम प्रतिसाद मिळत आहे.

 

आजच्‍या बसस्‍थानकावरील उपक्रमामध्‍ये एसटीचे विभाग नियंत्रक चंद्रकांत वडजकर, शिक्षणाधिकारी माध्‍यमिक माधव सलगर, शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. सविता बिरगे, शिक्षणाधिकारी योजना दिलीप बनसोडे, यंत्र अभियंता मंगेश कांबळे, वाहतूक अधीक्षक कमलेश भारती, आगार व्‍यवस्‍थापक अनिकेत बल्‍लाळ, बसस्‍थानक प्रमुख यासीन खान यांच्‍यासह संगीता साळुंके, प्रलोभ कुलकणी, हनुमंत पोकळे, सुधीर शिंदे, रवी ढगे, डॉ. राजेश पावडे, सारीका अचमे, सुनील मुत्‍तेपवार, शंकरराव नांदेडकर, साईनाथ चिंद्रावार, आशा घुले, शुभम तेलेवार आदींचा समावेश होता.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या