27.3 C
New York
Sunday, June 23, 2024

Buy now

एकाच वेळी चार धाब्यासह एका हातभट्टी अड्ड्यावर धाड

चकलांबा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त  

पाच आरोपींना जेरबंद करण्यात चकलांबा पोलिसांना यश

 गेवराई (महाराष्ट्र आरंभ) प्रतिनिधी:- आगामी लोकसभा निवडणू व आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने चकलांबा पोलिसांनी उमापूर येथील मंत्रालय धाबा, निवांत धाबा, उमापूर फाट्या नजीक असलेले पत्र्याचे शेड, तसेच चकलांबा येथील बिचकूल धाबा व फुलसांगवी येथील हातभट्टी अड्ड्यावर वेगवेगळ्या वेळी धाड टाकून देशी विदेशी अवैध दारूचा 35 हजार रुपयांचा मुद्देमाल सील करून 20000 हजार रुपये किमतीचे रसायन नष्ट केले. पाचही आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. पोलीस ठाणे चकलांबा येथे दारूबंदी कायदा कलम 65 ( इ)( फ ) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, ऑफर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे, पोलीस उपनिरीक्षक अनंता तांगडे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे, पोलीस उपनिरीक्षक कुमावत पोलीस कॉन्स्टेबल खटाणे, पोलीस कॉन्स्टेबल पवळ, पोलीस कॉन्स्टेबल घोंगडे, पोलीस हवालदार पवार, पोलीस हवालदार येळे यांनी केली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या