20.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावे डीजे मुक्त होणार

डीजे वाजविल्यास दंडात्मक कारवाई करून जप्त करणार – सपोनि नारायण एकशिंगे

गेवराई दि.१४ (प्रतिनिधी):- सध्या मोठ्या प्रमाणावर सण साजरे होत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डीजे सिस्टीम इत्यादीचा वापर होताना दिसून येत आहे. डीजेचा मोठ्या प्रमाणावर आवाजामुळे सर्व सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अतिउच्च आवाजामुळे अपघात देखील होऊ शकतात. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याचे उल्लंघन होऊ नयेत या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने यांच्या निर्देशानुसार तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम सन १९८६ सह ध्वनीप्रदूषण विनिमय व नियंत्रण नियमावलीनुसार चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६५ गावे आणि १५ तांडे असून हे डीजे मुक्त होणार असल्याचे चकलांबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी सांगितले.

डीजेचा कमीत कमी आवाजही सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या डेसिबल तीव्रते पेक्षाही जास्त असतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची पायमल्ली होण्याची शक्यता असते. तसेच डीजेच्या आवाजाच्या तीव्रतेमुळे व व्हायब्रेशनमुळे वयोवृद्ध नागरिक, रूग्णालयातील रूग, गरोदर महिला व लहान मुले यांना हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकांना डीजे न वाजण्याबाबत आवाहन केले आहे. तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ६५ गावे आणि १५ तांड्यात कुठेही डीजे मिळून आल्यास त्याला जप्त करून कायदेशीर दंडात्मक कारवाई करून जप्त केले जाईल असे देखील सांगितले आहे.

आरोग्याला त्रासदायक ठरणाऱ्या डीजेवर यावेळी पूर्णत: बंदी असून त्याचा वापर झाल्यास डीजे जप्त केला जाईल, असा चकलांबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी इशारा दिला आहे. मद्यपान करून धुडगूस घालणाऱ्या वर आळा घालण्याच्या दृष्टीने सध्याच्या काळात कुणीही डीजे लावु नये, आपल्या जुन्या पारंपरिक वाद्यांना पसंती द्यावी, तसेच सध्याच्या काळात कुणी डीजे वाजवल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील दिला आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या