चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे ॲक्शन मोडवर
गेवराई दि.१३ (प्रतिनिधी):- चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील दूरक्षेत्र उमापूर अंतर्गत मारुतीची वाडी या ठिकाणी डीजे वाजत असल्याबाबत व लोकांना रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याबाबत गोपनीय बातमीदारांमार्फत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना माहिती मिळताच लगेच टीम रवाना करून सदर डीजेवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार उमापूर पोलीस चौकी कडील नेमणुकीस असलेले कर्मचारी यांनी जाऊन सदर बाबत खात्री केली असता एक डीजे क्रमांक एम एच 04 FD 7073 मारुतीची वाडी रोड वरती लोकास रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा स्थितीमध्ये उभा असताना मिळून आला त्याच्या चालकाकडे परवाना बाबत विचारपूस केली असता त्याने उडवडीचे उत्तरे दिली गर्दीचा फायदा घेत तिथून पळून गेला. पोलिसांनी त्या डीजे चालक व मालकावरती कलम 188,283 प्रमाणे पोलीस ठाणे चकलांबा येथे गुन्हा दाखल केला आहे