मी विकासासाठी नियत साफ असलेली उमेदवार म्हणून मला जनतेने स्वीकारलय – पंकजाताई मुंडे
हजारो कोटींचा विकास निधी खेचून आणण्याची आमच्यात ताकद, त्यामुळे साथ द्या – आ.बाळासाहेब आजबे
पाटोदा येथे महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न, पंकजाताईंच्या विजयासाठी होणार सूक्ष्म नियोजन
पाटोदा दि.१२ (प्रतिनिधी):- माझ्यासह बीड जिल्ह्यातील अनेकांना स्व.मुंडे साहेबांनी आमदार-खासदार केले. त्यांनी नेहमीच परळीपेक्षा अधिक प्रेम आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघावर केले. त्याबदल्यात इथल्या जनतेने देखील कायमच मुंडे साहेब उभं करतील त्या नेत्याला मताधिक्य दिले. याही वेळी पंकजाताईच्या रूपाने ती संधी पुन्हा एकदा आली आहे. इथली जनता पुन्हा एकदा पंकजाताईला परळीपेक्षा अधिक मताधिक्य देईल, असा विश्वास कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पाटोदा येथे बोलताना व्यक्त केला.
पाटोदा येथे आ.बाळासाहेब आजबे यांच्यासह महायुतीतील मान्यवर नेत्यांच्या पुढाकारातून महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शहरातील चाऊस मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत धनंजय मुंडे बोलत होते.
पश्चिम वाहिनी नद्यांचे जे पाणी वाहून समुद्रात जाते, त्यातील सुमारे 165 टीएमसी पाणी हे वळवून बीड जिल्ह्यातील तुटीच्या भागात आणता आले तर, या जिल्ह्यात जलक्रांती होईल. या प्रकल्पासाठी सुमारे 1 लाख 17 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यापैकी 25 हजार कोटी राज्य सरकार तर 25 हजार कोटी केंद्र सरकार देणार आहे व उर्वरित रक्कम कर्ज स्वरूपात उभी करावयाची आहे. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी बीड जिल्ह्यातून दिल्लीत जाणारा खासदार हा पहिल्या ओळीत बसणारा असला पाहिजे, असेही धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले.
मी सरकारमध्ये असताना शेकडो गावांमध्ये हजारो कोटींचा विकास निधी दिला. जात-पात किंवा धर्म मध्ये न आणता केवळ विकास हेच धोरण ठेऊन काम केले. त्यामुळे आज लोकसभेची उमेदवार म्हणून जनतेत जाताना, लोक मला मी केलेल्या कामांमुळे विकासाची नियत साफ असलेली उमेदवार म्हणून स्वीकारत आहेत, असे मत लोकसभेच्या उमेदवार, भाजपनेत्या पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केले. प्रीतम ताईंना पाटोदा तालुक्याने जितकी लीड दिली, त्यापेक्षा अधिक लीड मला मिळेल, अस विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान खुंटेफळ साठवण तलावाचे काम जप्रमाणे मार्गी लागले, त्याच प्रमाणे तीन तालुक्यात मिळून सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातुन विकास निधी खेचून आणण्याची आमच्यात ताकद आहे, त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे, असा ठाम विश्वास आ.बाळासाहेब आजबे यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आ.भीमराव धोंडे, ज्येष्ठ नेते रामकृष्ण बांगर, अप्पा राख, सुधीर घुमरे, दीपक घुमरे आदिनीही आपले मनोगत मांडले.
कार्यक्रमास आ.बाळासाहेब आजबे, मा.आ.भीमराव धोंडे, रामकृष्ण बांगर, डॉ.शिवाजी राऊत, बाबासाहेब शिंदे, विजय गोल्हार, दीपक घुमरे, विश्वास नागरगोजे, राहुल चौरे, बाळा बांगर, वणवे दादा, अप्पा राख, काकासाहेब शिंदे, सुधीर घुमरे, भागवत येवले, नारायण शिंदे, देविदास शेंडगे, विठ्ठल सानप, अनिरुद्ध सानप, शंकर देशमुख, श्याम हुले, पोकळे ताई, मधुकर गर्जे, पांडुरंग नागरगोजे, महेश आजबे, अजय धोंडे, यश आजबे आदी उपस्थित होते.