23.1 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

बीड जिल्ह्याला गारपीटीने झोडपले; अवकाळी पावसाने पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान

हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

गेवराई दि.११ (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात विविध भागात गुरुवारी दुपारी वादळीवाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला तर धारुर, वडवणी व गेवराई तालुक्यात गारा बसरल्या. यामुळे पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळच्या सत्रामध्ये अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण होते परंतु दुपारी तीन ते चार या वेळेत अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने अनेकांची त्रेधातिरपिट उडली परंतु या पावसामुळे वातावरण थंडावा निर्माण झाल्याने थोडासा दिलासा मिळाला. गेवराई तालुक्यात झालेल्या अवकाळी पावस व वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळुन पडली तर काही ठिकाणचे नुकसान झाले. धारुर-वडवणी रस्त्यावर पहाडी दहिफळ येथे मोठे झाड पडल्याने काही वेळ वाहतुक बंद होती. उन्हाळी ज्वारी व बाजरीचे सुद्धा अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. बीड शहरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याचा पाऊस झाला परंतु नोंद घ्यावी असा पाऊस झाला नाही.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या