29.1 C
New York
Monday, June 17, 2024

Buy now

पाणीटंचाई असलेल्या चव्हाणवाडी तांड्याला करूणा धनंजय मुंडे यांच्याकडून टॅंकरची सोय

चव्हाणवाडी तांडा येथील नागरिकांनी मानले आभार..

गेवराई दि.११ (प्रतिनिधी):- मार्च महिन्यातच पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अनेक गावातील महिलांना भरउन्हात पायपीट करून पाणी आणावे लागते. उन्हाळा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात दरवर्षी पाणीटंचाई सुरू होते. पाणीटंचाईच्या झळा आता गेवराई तालुक्याला बसताना दिसून येत आहे. तालुक्यातील चव्हाणवाडी तांडा येथील नागरिकांना मार्च महिन्यातच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या तांड्यातील महिलांना भरउन्हात पायपीट करून पाणी आणावे लागते. गावात पाणी नसल्यामुळे स्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष करूणा धनंजय मुंडे यांनी चव्हाणवाडी तांडा येथील नागरिकांना आज (दि.११ एप्रिल) रोजी टॅंकरची व्यवस्था केली आहे. त्यामुळे चव्हाणवाडी तांडा येथील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे. 

बीड जिल्ह्यातील गेवराई, केज, अंबाजोगाई, धारूर बीड, वडवणी या तालुक्यात दुष्काळाची अधिकच दाहकता आहे. या तालुक्यातील गावांमध्ये पाण्यासाठी नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून स्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष करूणा धनंजय मुंडे यांनी मोफत टॅंकर दिले आहेत.

भर उन्हात हंडाभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करण्याची वेळ येत असताना शासनाकडून अनेक गावांत टॅंकर सुरू झालेले नाहीत. मात्र करूणा धनंजय मुंडे यांनी मोफत टॅंकर दिले आहेत. त्याचबरोबर आज गेवराई तालुक्यातील चव्हाणवाडी तांडा येथे मोफत टॅंकरची व्यवस्था केली आहे. पाण्याची सोय केल्यामुळे स्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष करूणा मुंडे यांचे चव्हाणवाडी तांडा येथील महिलांसह नागरिकांनी आभार मानले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या