28 C
New York
Thursday, June 13, 2024

Buy now

धारूर तालुक्यातील भोगलवाडी तलावातील येथे मोटारी केल्या जप्त पिण्याच्या पाण्याची धारुर तालुका प्रशासनाने घेतली गंभीर दखल

मंडळ अधिकारी वाघमारे यांची धडाकेबाज कारवाई;अनेक विद्युत मोटारी केल्या जप्त

भोगलवाडी दि.११ (प्रतिनिधी):- सध्याच्या कडक उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असुन, तलावातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचे कडक आदेश असतानाही कांही जण पाणी उपसा करत असल्याने धारूर तालुका तहसील प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून, रविवारी सुट्टीच्या दिवशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सोपान वाघमारे व त्यांच्या टीमने तालुक्यात धडाकेबाज मोहिम राबवत भोगलवाडी,काटेवाडी येथील अनेक अनाधिकृत विद्युत मोटारी जप्त केल्याची कारवाई केल्याने पाणी चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तर सर्व सामान्य नागरिकांतुन या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.

यासंदर्भात माहिती अशी की,गतवर्षी पावसाळ्यात पाऊसच न झाल्याने सर्वच विहिरी, नदी, नाले कोरडेठाक पडले असुन, भिषण पाणी टंचाईचे संकट घोंघावत आहेत. अशा भिषण पाणी टंचाईची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेऊन, बीड जिल्ह्य़ातील सर्वच प्रकारच्या तलावातील पाणी नागरिकांसाठी तसेच जनावरांसाठी आरक्षित करण्याचे आदेश गेल्या दीड दोन महिन्यांपासून काढलेले आहेत. या आदेशाची कडक अंमलबजावणी तालुका प्रशासन करत आहेत. धारूर तालुक्यात ही या आदेशाची कडक अंमलबजावणी होत असुन, तालुक्यातील सर्वच तलावातुन करण्यात शेतीसाठीचा व इतर पाणी उपसा तात्काळ बंद करण्यात यावा.असे आदेश तहसीलदार कांबळे यांनी संबंधित पाटबंधारे विभागासह महसुलच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले होते.तरी ही कांही जण पाणी चोरी करत असल्याने रविवारी माजलगावचे उपविभागीय अधिकारी इंगोले साहेब, धारूरचे तहसीलदार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सोपान वाघमारे,भोगलवाडीचे तलाठी मंदे तसेच पाटबंधारे विभागाचे कालवा निरीक्षक गुरनुले, नवघरे यांच्या संयुक्त पथकाने भोगलवाडी,काटेवाडी येथे दुपारी अचानक धाडी टाकुन तलावातुन पाणी उपसा करणाऱ्यांच्या विद्युत मोटारी जप्त केल्या.या धडक कारवाईमुळे पाणी उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले असुन, त्यांनी या कारवाईची धास्ती घेतली आहे.तर या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांतुन स्वागत करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या