२० हजारांचे रसायन व साहित्य केले नष्ट ; चकलांबा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
गेवराई दि.१२ (प्रतिनिधी):- चकलांबा पोलिसांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अवैध धंद्यावरील धडाकेबाज कारवायाची जणू काही मोहीमच उघडली आहे एका मागून एक अशा धडाकेबाज करावया करण्यात चकलांबा पोलिसांचा हातखंडा असल्याचे सिद्ध झाले आहे वाळू तस्करावरील कारवाई, अवैध दारू विक्रीवरील कारवाई, हातभट्ट्यावरील कारवाई , गांजा तस्कराविरोधातील कारवाई,चंदन चोराविरोधातील कारवाई, अनेक डीजे वरील कारवाई तसेच सर्वसामान्य जनतेच्या मालमत्ता चोरीचे, घरफोडी, दरोडाचे डिटेक्शन असो सर्वच बाबतीत चकलांबा पोलीस स्टेशन अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना चकलांबा पोलिसांचा अभिमान वाटावा असे काम चकलांबा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नारायण एक शिंगे यांच्या अधिपत्याखाली होत असल्याचे कारवायातून दिसून येत आहे. सर्वच बाबतीत धडाकेबाज कारवाया करण्यात चकलांबा पोलीस अग्रेसर असल्याने चकलांबा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंदे करणारे गुन्हेगार, समाजकंटक यांनी चांगला धक्काच घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चकलांबा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
आज रोजी चकलांबा पोलिसांनी फुलसांगवी येथील अंबादास गायकवाड याच्या हातभट्टीवर धाड मारून वीस हजाराचा रसायनासह मुद्देमाल नष्ट करून आरोपी अंबादास मनोहर गायकवाड राहणार फुलसांगवी तालुका शिरूर जिल्हा बीड या ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली आहे.
सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे पोलीस कॉन्स्टेबल खटाणे यांनी केली आहे