27.3 C
New York
Sunday, June 23, 2024

Buy now

माणसांमध्ये जिद्द आणि चिकाटी असल्यास कोणत्याही व्यवसाय मध्ये माणूस यशस्वी होऊ शकतो , नारायण साबळे  

माणसांमध्ये जिद्द आणि चिकाटी असल्यास कोणत्याही व्यवसाय मध्ये माणूस यशस्वी होऊ शकतो , नारायण साबळे

 

आष्टी प्रतिनिधी.

माणसांमध्ये जिथं आणि चिकाटी जर असेल तर कोणताही व्यवसाय करा त्यामध्ये तो 100% यशस्वी होऊ शकतो फक्त व्यवसाय करताना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असली पाहिजे असे प्रतिपादन एन ए प्रॉपर्टीज चे मालक नारायण साबळे यांनी आपल्या एन ए प्रॉपर्टीच्या भव्य ऑफिसचे उद्घाटन सोहळा समारंभ प्रसंगी व्यक्त केले

नारायण साबळे हे आष्टी तालुक्यातील घाटा पिंपरी येथील रहिवाश सध्या पुणे औंध येथे जाऊन आपल्या स्वतःचे येणे प्रॉपर्टी चे ऑफिस व कापडाचे दुकान हा व्यवसाय चालू करत त्यांनी यशस्वीरित्या ग्राहकांचे मन जिकत त्यांच्या व्यवसायात भरारी घेत आहेत

दहावी शिक्षण झाल्यानंतर पुण्याला 17 वर्षे नोकरी केली

नोकरीत मन रमत नव्हते नोकरीत मन रमत नसल्याने आपणही स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा हे ध्येय त्यांनी उराशी बाळगत नोकरी सोडली आणि रियल इस्टेट व्यवसाय मध्ये सुरुवात केली त्यामध्ये यश आल्यानंतर स्वतःची एन ए प्रॉपर्टी म्हणून फॉर्म काढली

आणि काही दिवसातच साई कलेक्शन कपड्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली व्यवसायात यश मिळाल्यानंतर

आपल्याला समाजासाठी काहीतरी करावी म्हणून ते सामाजिक धार्मिक क्षेत्रात आजही मोठे योगदान देत असतात त्यांच्या या एन ए प्रॉपर्टीज उद्घाटनप्रसंगी विविध मान्यवरांनी उपस्थिती लावत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते

 

======================

चौकट

 

आई वडिलांच्या स्मरणार्थ स्वखर्चाने घाटा गावात मोफत पाणी वाटप

 

समाजासाठी काहीतरी करायचं आहे या भावनेतून त्यांच्या आई-वडिलांचे स्मरणार्थ मोफत पाणी वाटपासप सुरवात केली

यावर्षी पाऊस न पडल्यामुळे

गावात दुष्काळ पडलेला आहे लोकांना पाण्याची पिण्याची अडचण होत आहे म्हणून मी ठरवलं की आठवड्यातून

दोनदा दोन टँकर

देण्याचे ठरवले आणि तो उपक्रम अमलात आणला आणि जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत हा उपक्रम चालू राहील असा संकल्प नारायण शंकर साबळे यांनी केला आहे त्यांनी गावात मोफत पाणीपुरवठा सुरू केल्याने गावकऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे तसेचसमाजकार्यात नारायण शंकर साबळे यांचा नेहमीच सहभाग असतो

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या