तलवाडा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी
तलवाडा प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील आज दिनांक 11 एप्रिल रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली ,
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तलवाडा पोलीस स्टेशनचे सपोनी निरीक्षक सोमनाथ नरके यांच्या हस्ते प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुढील कार्यक्रमाची रूपरेषा करण्यात आली, तर या कार्यक्रमाचे उपमुख पाहुणे तलवाडा पोलीस स्टेशनचे पीएसआय कोळी , व प्रमुख अतिथी म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिक यामध्ये जिल्हा परिषद सदस्य युवराज डोंगरे, जि प सदस्य सुरेश हात्ते ,कुरेशी नजिर राजाभाऊ खिस्ते, सभापती गीताराम डोंगरे ,आसाराम मराठी, आनंद डोंगरे ,सतीश गांधले, विजय डोंगरे, गणेश कचरे, अशोक आठवले ,बाबासाहेब आठवले, खेत्रे सर ,बापू गाडेकर,मदन करडे ,माऊली डोंगरे,अरुण डोंगरे,भरत शिणगे पत्रकार शेख अत्तिक, विष्णू राठोड डॉ सुरेश गांधले, सर्व भीमसैनिक उपस्थित होते,या दोन्ही जयंती निमित्त खेत्रे सर, सोमनाथ नरके यांनी आपले मनोगत व्यक्त केले , कार्यक्रमाचे आयोजक समितीचे मुख्य वेक्ती जि प शाळेचे मुख्याध्यापक विजय डोंगरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर सुरेश गांधले यांनी केले