6.7 C
New York
Saturday, January 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

बीड परळी महामार्गावर दिंद्रुड जवळ दुहेरी अपघातात तरुण गंभीर जखमी 

बीड परळी महामार्गावर दिंद्रुड जवळ दुहेरी अपघातात तरुण गंभीर जखमी

 

पुण्यभूमी/ प्रतिनिधी :

 

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड जवळ बीड परळी महामार्गावर मोटर सायकल व दोन चार चाकी वाहनांचा दुहेरी अपघात बुधवारी सायंकाळी आठ वाजे दरम्यान घडला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून उपचारार्थ हलविण्यात आला.

 

दिंद्रुडच्या बेलोरा फाटा जवळ हाकेच्या अंतरावर हा अपघात घडला. अल्ताफ रसूल सय्यद वय 25 वर्ष रा जवळा (फ) हा तरूण दिंद्रुड हुन स्वगावी दुचाकी क्र.एम एच 44 वाय 2738 ने परतत असताना गंगाखेडहून बीड कडे जाणाऱ्या एका चार चाकी एम एच 46 बी ए 1097 या वाहनाला धडक दिली.याच वेळी पाठीमागून येणाऱ्या चार चाकी एम एच 14 जे एच 0088 या गाडीवर जखमी तरुणाची मोटरसायकल आदळली. या अपघातात अल्ताफ रसूल सय्यद हा गंभीर जखमी झाला असून तिनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या