या घटनेमुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ : पूर्ण रस्ता चक्काजाम झाला होता.
माजलगाव दि,०९ प्रतिनिधी:- माजलगाव शहर पोलिस ठाण्याच्या परिसरात आज (दि.९) एका मनोरूग्णाने धिंगाणा घालत दगडफेक केली. या घटनेमुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. पूर्ण रस्ता चक्काजाम झाला. पोलिस ठाण्यात एकच पोलिस कर्मचारी हजर असल्याने पोलिसांनीही या घटनेकडे दुर्लक्ष केले.
एक मनोरूग्ण युवक आज (दि.९) माजलगाव शहर पोलिस ठाण्यासमोर आला. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्याच्या परिसरात दगडफेक करायला सुरूवात केली. दीड तास सुरू असलेल्या या घटनेमुळे वाहनधारकांना या त्रासाला सामोरे जावे लागले. यामुळे वाहनांची कोंडी झाली. पोलिस ठाण्यात एकच पोलिस कर्मचारी हजर असल्याने पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले. पोलिस ठाण्याच्या परिसरात झालेल्या या घटनेवेळी एकही पोलिस कर्मचारी तेथे न आल्याने पोलिसांची दहशत कमी झाल्याची चर्चा शहरवासियांमध्ये होती. काही वेळाने नागरिकांनी एकत्र येत शेवटी त्या मनोरुग्णाला पोलिसांच्या स्वाधीन केले.