27.3 C
New York
Sunday, June 23, 2024

Buy now

जोला येथे भव्य संगीत तुलशीरामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळा

भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे – इंजी प्रकाश ढाकणे

गेवराई, दि.०९ प्रतिनिधी:- जोला येथे भव्य संगीत तुलशीरामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे शनिवार ०६ एप्रिल २०२४ ते शनिवार १३ एप्रिल २०२४ या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक इंजी.प्रकाश ढाकणे यांनी केले आहे.

केज तालुक्यातील जोला येथे कथाप्रवक्ते डॉ.ह.भ.प.प्रल्हाद महाराज ढाकणे शास्त्री यांच्या सुश्राव्य वाणीतून भव्य संगीत तुलशीरामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यात दैनिक कार्यक्रम जोला ग्रामस्थ भजनी मंडळ यांचे सायं.५ ते ६ हरिपाठ, ६ ते ७ भोजन, रात्री ८ ते ११ तुलशीरामायण कथा तर शनिवार दि. १३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत डॉ.श्री ह.भ.प. प्रल्हाद महाराज ढाकणे शास्त्री यांचे अमृततुल्य काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसाद होईल तरी पंचक्रोशितील सर्व गावकऱ्यांनी व राम भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक इंजी.प्रकाश शिवाजीराव ढाकणे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या