राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष:- डॉ.गणेश ढवळे
बीड दि.०९ प्रतिनिधी:- धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खजाना विहिरी नजीक रस्त्याच्या लगत असलेल्या शेतजमीन मालकांकडून गवत पेटवून दिले जात असल्याने ऐन उन्हाळ्यात पाण्याची गरज असताना तग धरून दुतर्फा लागवड केलेली राहिलेली झाडे आगीत होरपळून गेली असुन गवती कचरा जाळताना पेटवुन देणा-यांनी झाडांना हानी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असताना ती घेतली जात नसुन झाडांची निगा राखण्याची जबाबदारी असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा याचे सोयरसुतक नसल्याचे दिसत आहे.वृक्षप्रेमींकडुन याबद्दल हळहळ केली जात आहे.संबधित प्रकरणात संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज असुन वनविभागाने संबंधित प्रकरणात कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
दुभाजकावरील आकर्षक फुलांची निगा मात्र दुतर्फा झाडांकडे दुर्लक्ष
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकामधील रंगीबेरंगी आकर्षक फुलांच्या झाडांची छाटणी आणि नियमित टँकर द्वारे पाणी घालून निगा राखण्यात येते मात्र रस्त्याच्या दुतर्फा लागवड केलेल्या वृक्षांची जोपासना करण्यात अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसुन येत आहे.
रस्ते विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचे नुकसान, नियमांची पायमल्ली :- डॉ.गणेश ढवळे
रस्ते विकासाच्या नावाखाली रस्ते विकास महामंडळाने धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल करून पर्यावरणाचे अतोनात नुकसान केले.मराठवाड्याचे हरितक्षेत्र अवघ्या ५ टक्क्यांवर आलेले असताना धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हजारों शंभरवर्षे जुन्या वड, कडुनिंब, औदुंबर सारख्या मोठ्या वृक्षांची अक्षरक्ष: कत्तल केली.नियमानुसार झाडे कापली जातील त्याच्या दहापट झाडे लावण्याची जबाबदारी रस्ते विकास महामंडळाची आहे.मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे.