27.3 C
New York
Sunday, June 23, 2024

Buy now

शिरूरच्या कृषी भवन इमारतीसाठी पाच कोटी सत्तर लाख रुपयांची मंजुरी* -आमदार आजबेंच्या पाठपुराव्याला कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी दिली मंजुरी-

शिरूरच्या कृषी भवन इमारतीसाठी पाच कोटी सत्तर लाख रुपयांची मंजुरी* -आमदार आजबेंच्या पाठपुराव्याला कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी दिली मंजुरी- शिरूरकासार:-(प्रशांत बाफना) तालुक्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या कृषी भवन कार्यालयाच्या इमारतीसाठी पाच कोटी सत्तर लक्ष रूपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली असून आमदार बाळासाहेब आजबे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.तालुका निर्मिती झाल्यानंतर तालुक्याच्या एकाही शासकीय कार्यालयाला हक्काची इमारत नसल्यामुळे सर्व कार्यालये किरायाच्या जागेत थाटलेली आहेत.अशा परीस्थितीत शासकिय इमारतींना निधी उपलब्ध होत नसायचा.तालुक्यातील वारणी परिसरात बहुतांश कार्यालयांना ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करुन दिल्यामुळे त्या परीसरात शासकिय कार्यालयांच्या हक्कांच्या इमारती आता उभ्या रहायला लागल्या आहेत.कृषी कार्यालयाची इमारत उभारणी होणे गरजेचे असताना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यासाठी पाच कोटी सत्तर लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.आमदार बाळासाहेब आजबे यांनी शिरूर तालुक्याच्या दृष्टीने इमारतीचे महत्व लक्षात घेऊन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे त्यांच्या मागणीला यश आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विश्वास नागरगोजे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार बाळासाहेब आजबे यांचे तालुकावासियांच्या वतीने आभार मानले आहे. चौकट *ग्रामीण रुग्णालय आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत प्रगतीपथावर* आमदार बाळासाहेब आजबे यांनी शासकिय कार्यालयांच्या इमारतींच्या मंजुरीसाठी पुढाकार घेतला असून वारणी परीसरात ग्रामीण रुग्णालय आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतींची कामे प्रगतीपथावर आहेत.तसेच दुय्यम निबंधक कार्यालय,महसूल कर्मचारी निवासस्थान आणि ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी होणाऱ्या वस्तीगृहाच्या इमारतींना देखील त्यांच्याच प्रयत्नांनी प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या