27.5 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

तागडगांव नगरी बोलक्या ज्ञानेश्वरी च्या स्वागतासाठी सज्ज

तागडगांव नगरी बोलक्या ज्ञानेश्वरी च्या स्वागतासाठी सज्ज !

 

महंत डॉ न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांनी ग्रामस्थांची विनंती केली मान्य !

 

भगवानगडासाठी मदतीचाही उच्चांक ओलांडणार संत भगवानबाबांच्या माऊशिचे गांव !

शिरूर कासार(प्रशांत बाफना) : तालुक्यातील तागडगांव हे ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा च्या माऊशिचे गांव म्हणून ओळखले जाते ,भगवान गडाचे विद्यमान महंत डॉ न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांचे महाराष्ट्रभर जंगी स्वागत केले जात आहे तसेच गडावर उभारले जाणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीचे सुमारे बावीस कोटीच्या भव्य मंदिरासाठी देणगी दिली जात आहे आपलाही यात सहभाग असावा यासाठी तागडगांव ग्रामस्थांनी गडावर जाऊन विनंती केली ही विनंती मान्य केल्याने तागडगांव बोलक्या ज्ञानेश्वरीच्या म्हणजेच शास्त्रिजींच्या स्वागताला सज्ज तर झालीच आहे परंतू आजवरचा देणगीचा उच्चांक ओलांडण्याची मानसिकता ठेवली आहे .

वीस ते सत्ताविस जानेवारी या कालावधीमधे संत भगवान बाबांच्या पुण्यतिथी निमित्ताने तागडगांव येथे महंत अतुल महाराज शास्त्री यांचे मार्गदर्शनाखाली सप्ताह होणार आहे ,या सप्ताहाच्या काल्याच्या किर्तनासाठी ग्रामस्थांनी विनंती केली व गडावरील ज्ञानेश्वर मंदिरासाठी लोकवाटा देण्याचा मानस व्यक्त केला त्यांंची ही विनंती मान्य करून २७ जानेवरीला ते येणार आहेत .

महंत शास्त्रीबाबा आपल्या गावात येणार असल्याने तागडगावात चैतनदायी वातावरण तयार झाले असुन अभुतपुर्व स्वागत होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले .

आजवर गडावरून धर्मकार्यासाठी महंत ,शास्त्री ,किर्तनकार ,गायक ,वादक घडवले जात होते आता गडाने आणखी एक पाऊल पुढे टाकून प्रशासकिय अधिकारी बनवण्यासाठी एमपीएससी युपीएस सी या उच्च अभ्यासक्रमाची तयारी ठेवली आहे गडावरून आता वर्ग एक वर्ग दोन चे अधिकारी घडणार असल्याने गडाची उंची गगणचुंबी ठरणार असल्याचा आनंद ग्रामस्थ व्यक्त करत आहेत .

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या