बीड जिल्ह्यातील बौद्ध स्थळांना निधी उपलब्ध करून द्यावा – मिलिंद घाडगे
परळी प्रतिनिधी. बीड जिल्ह्यातील बौद्ध स्थळांना राज्य सरकारने तीर्थक्षेत्र विकास निधीच्या नावाखाली देण्यात येणारा निधी देण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी राज्यपाल रमेश बैस यांना केली आहे. याबाबत बीड जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यामार्फत राज्यपालांना दिलेल्या निवेदनात मिलिंद घाडगे यांनी म्हटले आहे की, नुकताच शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकास साठी कोट्यावधींचा निधी देण्यात आला. परंतु यामध्ये बौद्ध स्थाळांना डावलण्यात आले असे घाडगे यांनी म्हटले आहे.तर बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील श्रावस्ती बौद्ध विहार, चांदापूर तालुका परळी तसेच परळी शहरातील भीम नगर येथील नियोजित बौद्ध विहार सिरसाळा येथील बौद्ध विहारांनाही निधी देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
या प्रश्नी मिलिंद घाडगे यांनी काल दिनांक 26 रोजी बीडच्या जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ मुंडे यांच्याशी सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले.