ऊसतोडणी दरवाढीची पाचवी बैठकही निष्फळ
साखर संघ २९% तर संघटना ४०% वर ठाम
पुणे दि.२७/१२/२३: राज्य साखर संघाचे पदाधिकारी व ऊस तोडणी वाहतूक कामगार संघटनांचे प्रतिनिधी यांची मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथे आज झालेल्या पाचव्या बैठकीत ही उभय मान्य तोडगा निघाला नाही. ऊसतोडणीचा साखर संघाने २९% वाढीचा प्रस्ताव दिला. तर संघटनेच्या वतीने ४०%वाढीची मागणी करण्यात आली. ४ किंवा ५ जानेवारी रोजी पुन्हा बैठक घेऊन अंतिम निर्णय करण्याचे ठरविले आणि बैठक समाप्त झाली.
बैठकीत साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, राष्ट्रीय फेडरेशन चे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, आ. प्रकाश सोळंके, आ. प्रकाश आवाडे, कल्याणराव काळे, संजय खताळ उपस्थित होते. तर कामगार संघटनांचे डॉ. डी.एल. कराड, आ. सुरेश धस, प्रा.डाॅ. सुभाष जाधव, प्रा. सुशीला मोराळे, प्रा. आबासाहेब चौगले, दत्ता डाके, विष्णुपंत जायभाय, जीवन राठोड, सुखदेव सानप, दादासाहेब मुंडे, गोरक्ष रसाळ, प्रदीप भांगे, नामदेव राठोड, मोहन जाधव, श्रीमंत जायभावे, दत्तात्रय भांगे, संजय तिडके, कृष्णा तिडके, गहिनीनाथ थोरे पाटील आदी उपस्थित होते.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आलेले कामबंद कोयता बंद पुढील बैठकीपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
*आपला – मोहन जाधव (बीड)*
9923549054