27.5 C
New York
Monday, June 17, 2024

Buy now

डाॅ.रविंद्र जगतकरांना आरोग्य क्षेत्रातील कार्याबद्दल सु-लक्ष्मी संस्थेकडून राज्यस्तरीय सेवा गौरव पुरस्कार जाहीर

*डाॅ.रविंद्र जगतकरांना आरोग्य क्षेत्रातील कार्याबद्दल सु-लक्ष्मी संस्थेकडून राज्यस्तरीय सेवा गौरव पुरस्कार जाहीर*

 

परळीचे डाॅ.रविंद्र जगतकर यांचे मित्र परिवारा कडून अभिनंदन

 

बीड(प्रतिनिधी) ठाणे व रायगड जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक तथा परळी शहरातील जगतकर गल्ली येथील भूमिपुत्र डाॅ.रविंद्र प्रकाश जगतकर यांना सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह घाटि छत्रपती संभाजीनगर मार्फत दिला जाणार राज्यस्तरीय सेवागौरव पुरस्कार २०२३” देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष सुमित पंडित यांनी एका पत्राद्वारे प्राप्त झाली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून मान्यवर, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून स्वागत व अभिनंदन होत.

छत्रपती संभाजीनगर सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह घाटी मार्फत सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वास त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरित करून त्यांच्या कार्यास बळ देण्याच्या विधायक उद्देशाने कर्तृत्ववान व्यक्तींना दरवर्षीच हा मानाचा पुरस्कार देण्यात येतो. यावेळी सामाजिक, आरोग्य क्षेत्रात आपल्या कार्यशैलीचा आगळा-वेगळा ठसा उमटविणाऱ्या, ठाणे व रायगड जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक तथा परळी वैद्यनाथ शहरातील जगतकर गल्ली येथील भूमिपुत्र डाॅ.रविंद्र प्रकाश जगतकर यांनी सामाजिक बांधिलकीतून आरोग्यसेवक म्हणून वैद्यकीय क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून “रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा” मानत कार्य करत आहेत. एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत ०१ एप्रील २०२० पासुन १,५६, ३९२ गरजूंना प्रत्यक्षात लाभ मिळवुन दिला. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन १ जानेवारी २०१८ ते आजपर्यंत ठाणे जिल्हयामध्ये ४३१९ व रायगड जिल्हयामध्ये ११७९ गरजुंना लाभ देवुन सहकार्य केले.गेली 10 वर्ष वैद्यकीय सेवा केलेली आहे. रूग्णसेवा करणं हे डॉक्टरांचे कर्तव्य आहे. परंतु एक माणूस म्हणून सुद्धा त्यांनी चांगले काम या भागात उभारले आहे. कोरोनाच्या काळात असंख्य गोर-गरीबांना व सर्वसामान्यांना मदतिचा हात दिला आहे. वैद्यकीय सेवेत असताना अनेक रुग्णानाचे जीव वाचविण्यासाठी केलेला प्रयत्न हा माणूसकीचे दर्शन घडवितो. सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन कामगिरी केली आहे. त्याच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह यांच्या वतीने दिला जाणारा “सेवागौरव राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर झाला आहे.

सेवा गौरव पुरस्कार सोहळा सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह घाटि छ.संभाजीनगर मार्फत दिला जाणार आहे.छ.संभाजीनगर येथे मोठ्या थाटात सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा व कु.लक्ष्मी सुमित पंडित हिच्या नवव्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक २९/१२/२०२३ रोजी शुक्रवारी दुपारी १२:१०.वा. ते ०५.१०.मी. पर्यत मौलाना आझाद रिसर्च सेंटर टिव्हि सेटर रोड छ.संभाजीनगर येथे कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.असे नीवड समिती तर्फे पत्राद्वारे समाजसेवक सुमित पंडित यांनी कळविले आहे. यावेळी डाॅ.रविंद्र जगतकर म्हणाले की, मिळालेला पुरस्कार माझी सामाजीक जबाबदारी व काम करण्याची नैतिक जबाबदारी वाढवीत आहे तसेच ते माझा उत्साह वाढवीत मला सकारात्मक ऊर्जा देत माझी प्रेरणा वाढवीत असल्याचे मत त्यांनी. आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केले. या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल डाॅ.रविंद्र जगतकर यांचे सामाजिक, वैद्यकीय व सर्व क्षेञातील मान्यवर, मित्र परिवार व नातेवाईकांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे.

 

*विविध पुरस्काराने सन्मानित*

 

सावित्रीज्योती सन्मान पुरस्काराने सन्मानीत -राज्यस्तरीय,समाज भुषण पुरस्काराने सन्मानीत श्रीनाथ मानव सेवा मंडळ राज्यस्तरीय, कार्यगौरव पुरस्काराने सन्मानीत तक्षशिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्था व साप्ताहीक मानपत्र.,परळी वैजनाथ, उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानीत राज्य शासन आरोग्य हमी सोसायटी., उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानीत जिल्हा आरोग्य विभाग, उत्कृष्ट कामगिरीसाठी सत्कार “आयुष्यमान भव ” अभियाना कार्यक्रमा अंतर्गत, एकात्मिक आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे आणि महात्मा ज्योतीराव, फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उल्लेखनीय कामगिरीसाठी सन्मानीत, सर्टिफिकेट ऑफ पार्टीसिपशन (स्टेट लेव्हल काँक्लावे , मुंबई ) तसेच यापूर्वी ही त्यांनी केलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्यामुळे बऱ्याच राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानीत झालेले आहेत.

 

*विशेष कार्य*

 

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत ०१ एप्रील २०२० पासुन १,५६, ३९२ गरजूंना प्रत्यक्षात लाभ मिळवुन दिला. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचा ५ लाखाचा शासनाचा मोफत विमा म्हणजे आयुष्मान कार्ड (गोल्डन कार्ड) ५,६६,८८४ ( ५ लाख ६६ हजार आठशे चौर्यांशी) लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड मिळवुन दिले. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन १ जानेवारी २०१८ ते आजपर्यंत ठाणे जिल्हयामध्ये ४३१९ व रायगड जिल्हयामध्ये ११७९ गरजुंना लाभ देवुन सहकार्य केले. तसेच एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत जिल्हयामध्ये १० मुत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रकिया मोफत करण्यात आल्या. शासन आपल्यादारी व विकसित भारत संकल्पयात्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत संपुर्ण जिल्हयामध्ये व गावागावांमध्ये आयुष्मानकार्ड शिबीर भरवुन जास्तीत जास्त लोकापर्यंत शासनाची मोफत आरोग्य सेवा व योजनांची प्रभावी अमल बजावणीसाठी उल्लेखनीय प्रयत्न केले. अंगीकृत रुग्णालया (शासकीय / खाजगी ) मध्ये शासकीय वैद्यकिय तपासनी करुन रुग्णालयाचा दर्जा सुधारण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करुन उपचार पध्दती सुधारण्यास मदत केली. शासनाकडुन राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय परिषद घेऊन आरोग्य योजनेचं महत्व आणि सामान्य लोकांनी त्याचा कसा फायदा घ्यावा यावर वारंवार मार्गदर्शन केले. केंद्र व राज्य शासनाच्या महत्वकांसी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेसाठी जिल्हा वैद्यकिय अधिकारी व तदनंतर साल २०१७ साली जिल्हा समन्वयक अधिकारी ( जिल्हा रायगड ) व २०१९ साली ठाणे जिल्हयाचे जिल्हा समन्वयक अधिकारी म्हणुन निवड झाली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या