23.1 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

ऊस तोडणी कामगारांच्या संपाची बैठक विस्कटली शरद पवारच घेतील अंतिम निर्णय साखर संघाचा निर्णय..

ऊस तोडणी कामगारांच्या संपाची बैठक विस्कटली शरद पवारच घेतील अंतिम निर्णय साखर संघाचा निर्णय..

प्रतिनिधी – महाराष्ट्राच्या साखर कारखान्यावर काम करणाऱ्या ऊस तोडणी कामगारांच्या झालेल्या आनेक बैठकीमध्ये ऊस तोडणी कामगारांच्या संघटनांनी घेतलेली भूमिका साखर संघाच्या प्रतिनिधींनी अत्यंत गंभीरपणे घेतले असून येणाऱ्या आठ दिवसात योग्य मार्ग निघला नाही तर राज्यातले सर्व साखर कारखाने उसाच्या अभावी बंद पडतील विशेष म्हणजे संघटनाच्या भूमिकेमुळे ऊस तोडणी कामगार सुद्धा बेमुदत कोयता बंद करण्याचे भूमिकेत आहे या गोष्टीची दखल साखर संघाने घेतली आहे त्यामुळे त्यांनी दोन दिवसांपूर्वी संघटनांनी जी बंदची हक्क दिली होती त्यानंतर आज तातडीची बैठक घेऊन याबाबत योग्य तोडगा काढावा अशी विनंती संघटनेला केली होती त्यामुळे पुणे येथे वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये ऊस तोडणी कामगारांच्या एकूण आठ संघटना व साखर संघाचे प्रतिनिधी यांच्यामध्ये बैठक झालेली आहे या बैठकीला साखर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील उपाध्यक्ष आमदार प्रकाश सोळुंके कलाप्पा आवाडे कल्याण काळे मुख्य कार्यकारी अधिकारी खताळ ऊस तोडणी मजूर संघटनेच्या वतीने आमदार सुरेश धस प्राध्यापक सुशीलाताई मोराळे डॉक्टर डी एल कराड विष्णुपंत जायभाय श्रीमंत जायभाय दत्तात्रय भांगे प्राध्यापक सुभाष जाधव दादासाहेब मुंडे जीवन राठोड प्रदीप भांगे गहीनाथ दादा थोरे सुखदेव सानप गोरक्ष रसाळ हे प्रतिनिधी उपस्थित होते बैठकीच्या सुरुवातीला साखर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश दांडेकर यांनी साखर संघाच्या वतीने ऊस तोडणी कामगार मुकादम व वाहतूकदार संघटनेने ठेवलेल्या प्रस्तावा बाबत सभागृहाला माहिती दिली व संघटनेने योग्य तो मार्ग काढावा यासाठी आम्ही दिलेल्या प्रस्तावावर विचार करावा असे सुचवले त्यानंतर संघटनेच्या वतीने कमीत कमी 45 टक्के वाढ देण्यात यावी असे सुचवले त्यानंतर साखर संघाच्या वतीने दोन टक्के अधिक वाढ देण्याची तयारी दाखवण्यात आली. मात्र संघटनांच्या प्रतिनिधींचे याबाबत एकमत होऊ शकले नाही त्यामुळे 29 टक्के वाढ देण्याची साखर संघाची तयारी असतानाही यामध्ये मार्ग निघू शकला नाही तत्पूर्वी संघटनेच्या प्रतिनिधींनी 40% चा प्रस्ताव दिलेला होता यावर साखर संघांनी आठ दिवसाचा वेळ मागितला आहे 5 जानेवारी पूर्वी साखर संघाचे प्रमुख मार्गदर्शक शरदचंद्रजी पवार यांच्याबरोबर याबाबत अंतिम चर्चा करून संघटनेच्या प्रतिनिधी सह शरद पवार यांच्याच उपस्थितीमध्ये अंतिम बैठक घेतली जाईल व जो काही निर्णय होईल तो साखर संघासाठी व ऊस तोडणाऱ्या कामगारांच्या संघटनेसाठी दोन्ही बाजूनी मान्य केला जाईल असा प्रस्ताव आलेला आहे त्यामुळे आज झालेली ही बैठक स्थगित करण्यात आली असून अंतिम निर्णयासाठी संघटनेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये व साखर संघाच्या वतीने शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये जो निर्णय करायचा आहे त्याबाबत पाच जानेवारी रोजी पुणे अथवा साखर संघ सुचवेल त्या ठिकाणी ही बैठक घेण्याचे निश्चित झाले आहे या बैठकीमध्ये आज ऊस तोडणाऱ्या मजुरांच्या मजुरी सोबतच मुकादामांच्या कमिशन बाबत चर्चा करण्यात आली त्याचबरोबर वाहतूकदारांना ज्या ज्या लोकांनी फसवले आहे अशा लोकाबाबत व कारखान्यांनी उचल दिलेल्या मुकादमाबाबत होत असलेल्या कार्यवाहीच्या संदर्भात सर्व समावेशक चर्चा होऊन साखर संघाच्या व तोडणी कामगारांच्या संघटनेच्या प्रतिनिधींच्या वतीने याबाबतचा एक कायदा करण्यात यावा असा ठराव करण्यात आला व तो एकमताने राज्य सरकारकडे पाठवण्यात यावा असेही आजच्या बैठकीत ठरले आहे त्यामुळे आज झालेल्या बैठकीत अत्यंत सविस्तर चर्चा झाली असून ऊस तोडणाऱ्या मजुरांच्या पदरात नक्की चांगले काहीतरी पडेल अशी आशा निर्माण झालेली आहे त्यामुळे वेगवेगळ्या कारखान्यावर काम करणाऱ्या मजुरांनी व त्यांच्या मुकादमाने 5 जानेवारी पर्यंत अंतिम निर्णय काय होणार आहे याबाबत वाट पाहावी असेही आव्हान करण्यात आले आहे….

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या