पियुशा पाटील यांची भाजप महिला मोर्चाच्या वाकड थेरगाव महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड
* महिलांसाठी विविध उपक्रम राबवून पक्ष संघटन मजबूत करनार- पियुषा पाटील
सुमेध करडे तलवाडा
पिंपरी चिंचवड येथील महाराष्ट्रातील सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम फेसबुक च्या माध्यमातून सर्वांच्या घराघरात पोहोचलेल्या पियुशा पाटील यांची भारतीय जनता पार्टी वाकड थेरगाव मंडळच्या महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड झाली असून त्यांच्या ह्या निवडीने त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्ष होत असून पियुशा पाटील यांच्या निवडीने पक्ष संघटन मजबूत होत असल्याचे बोलले जात आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोशल मीडियाच्या माध्यमातून रियल स्टार पियुशा पाटील हे नाव महाराष्ट्रातील प्रत्येक गावात ओळखीचे झालेले आहे त्यांची प्रत्येक व्हिडिओ मोबाईल धारक लाईक केल्याशिवाय राहत नाही खूप छान एक्टिंग करतात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची एक ओळख निर्माण झाली असून त्यांना भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाचे अध्यक्षपदी नियुक्ती केल्यामुळे त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी आली असून त्या म्हणाल्या की, यापुढे महिलांचे अनेक प्रश्न पक्ष संघटनेच्या मार्फत सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार असून महिलांचे एक मोठं संघटन भारतीय जनता पक्षात उभ करणार असून भारतीय जनता पक्षाचे विचारधारा घराघरात पोहोचणार असून येणारी निवडणूकित विजय हा पक्षाचा होणार असून पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार आहे पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे ही चांगल्या पद्धतीने मार्गी लावण्याचे काम करणार असून वाकड थेरगाव घराघरात भाजपा दिसून येणार आहे यातील मात्र शंका नाही विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मला ज्या शुभेच्छा दिल्या आहेत ते मनापासून स्वीकारून आपली ऋणी राहील आपण दिलेल्या शुभेच्छा हे मला बळ देण्याचे काम करत आहेत
नियुक्ती पत्र देताना यावेळी उपस्थिती शहराध्यक्ष शंकर जगताप, प्रसाद कस्पटे अध्यक्ष वाकड थेरगाव मंडळ, संदीप नखाते अध्यक्ष सांगवी रहाटणी मंडळ, सोमनाथ भोडवे, अध्यक्ष भाजपा रावेत काळेवाडी मंडळ तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते