27.3 C
New York
Sunday, June 23, 2024

Buy now

दिवा’ज’ बिगेस्ट डांस फेस्टिवल-३ मोठया उत्साहात संपन्न.

दिवा’ज’ बिगेस्ट डांस फेस्टिवल-३ मोठया उत्साहात संपन्न.

 

अमित जाधव- प्रतिनिधी

 

ठाणे, दिवा ता २५ डिसें : आर के डान्स अँड फिटनेस स्टूडियो प्रस्तुत दिवा’ज’ बिगेस्ट डांस फेस्टिवल सीजन थ्री दिनांक २४ डिसेंबर रोजी दिवा स्टेशन येथील नागनाथ मंदिरा जवळील मैदानात मोठया उत्साहात व शेकडो लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रसंगी आर के डान्स अँड फिटनेस स्टुडिओच्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतलेला होता व खूप भव्य दिव्य असा नृत्य सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अनेक प्रतिष्ठित मान्यवर व शेकडो दिवेकर रसिक उपस्थित होते. प्रसंगी अनेकांचा कला अविष्कार पहावयास मिळाला. सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रतिक ढाले आणि राहुल कासारे सर यांनी केले होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या