राज्यस्तरीय खुल्या कराटे स्पर्धेत शौर्य सुनील वारकरी आणि संघाचे घवघवीत यश
बीड :- बीड येथे दि.२४ डिसेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय खुल्या कराटे स्पर्धेत शौर्य वारकरी आणि संघाने पहिले क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
तसेच संघातील इतर खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत संघासाठी अनेक पदक कमावली.
श्री समर्थ पब्लिक स्कूल,संभाजी नगरच्या या विद्यार्थ्यांनी ही प्रशंसनीय कामगिरी केली.
त्यांच्या या यशासाठी शहरातील प्रतिष्ठित पत्रकार श्री वाव्हळकर सर,पत्रकार शिरसाट सर,जिल्ह्याचे डी वाय एस पी.श्री वाळके साहेब,तसेच दिग्दर्शक सुरज वि.सिरसाट यांनी कौतुक केले तसेच भविष्यासाठी विद्यार्थ्यांना अगणित शुभेच्छा दिल्या.