तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात स्टाफ नर्स डे नाईट; बाकीचा स्टाफ करतो काय..? सौदागर
सुमेध करडे तलवाडा
तालुक्यात तलवाडा प्रथमिक आरोग्य केंद्र सर्वात मोठे असताना या ठिकाणी डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे व पाठीशी घालणारे सुपरवायझर व क्लर्क त्यांच्या सहमतीमुळे दांड्या मारणाऱ्यांना सुगीचे दिवस आलेले असून स्टाफ नर्स डे नाईट ड्युटी करत असताना बाकीचे कर्मचारी करतात तरी काय..? असा प्रश्न गावकऱ्यात निर्माण झाला असून या दांड्या मारणाऱ्या कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी व डे नाईट ड्युटी करणाऱ्या टाफनर्सची ही चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते खिजर सौदागर यांच्याकडून होत आहे.
गेल्या अनेक दिवसापासून या आरोग्य केंद्रात रुग्णांना वेळेवर सेवा मिळत नाही तलवाडा व परिसरातील दहा ते बारा गावचे नागरिक उपचारासाठी येत असताना या ठिकाणी रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही तर या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना उद्धट पणाची भाषा करण्यात येत असल्याचे नागरिकात बोलले जात असताना या ठिकाणी काम करणारे कर्मचारी या ठिकाणी राहण्यासाठी कॉटर असतानाही तालुक्यावरून नोकरी करत असल्यामुळे काम चुकार कर्मचाऱ्यावर वचक नाही तर त्यांना पाठीशी करण्याचा प्रकार या ठिकाणचे डॉक्टर सुपरवायझर व क्लर्क करत असताना त्यांच्या मनमानी कारभारामुळे या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उद्धट पणाची भाषा या ठिकाणच्या शिपायाकडू होत आहे.
आरोग्य सचिव तुकाराम मुंडे गेले आणि आरोग्य विभागाला अवकाळा निर्माण झालेली असून याचाच फायदा या ठिकाणी नोकरी करणारे कर्मचारी घेत असताना या आरोग्य केंद्रात डे नाईट ड्युटी करणारे कर्मचाऱ्यांना मात्र वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे दांड्या मारण्याचा फायदा होत आहे तर या ठिकाणी काम करणारी टाफ नर्स डे नाईट ड्युटी करत असताना बाकी कर्मचारी करतात तरी काय असा प्रश्न नागरिकांत निर्माण होत असताना टाफ नर्स मुळे डे नाईटला या ठिकाणी वेळेवर उपचार मिळत नाही तर टॉफ नर्स इतरांच्या ड्युटी करत असताना बाकीच्यांना दत्तक घेतले आहे की काय असा प्रश्न नागरिकांत निर्माण होत असून ही नर्स म्हणजे स्वतःला एक प्रकारे वैद्यकीय अधिकारी समजत असल्यामुळे नाईटला या ठिकाणी उपचार मिळत नाही.
जिल्हा वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी तलवाडा आरोग्य केंद्रात चाललय तरी काय याकरिता लक्ष देऊन टाफ नर्स जर ड्युटी करत असेल इतर कर्मचारी करतात तरी काय आणि त्यांच्यावर कुणाचा वचक आहे की नाही.?
सर्वसामान्य रुग्णांना याठिकाणी उपचार मिळत नसल्यामुळे खाजगी उपचार घेण्यासाठी नागरिकांनी पायपीट करत आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत असताना दांड्या मारणाऱ्या कर्मचाऱ्यावर कोणाचाच वचक नसल्यामुळे या ठिकाणी मनमानी कारभार सुरू असून या ठिकाणी इतरांची ड्युटी करणाऱ्यामुळे रुग्णांनाही वेळेवर उपचार मिळत नसून स्वतःला एक वैद्यकीय अधिकारी सारखे वागत असल्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे समाजसेवकाकडून व रुग्णाकडून बोलले जात आहे.
तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांत परमनंट कर्मचाऱ्यासाठी या ठिकाणी राहण्याची वावस्था शासनाने केलेली असताना या ठिकाणी डॉक्टर , सुपरवायझर क्लर्क कोणीच राहत नसल्यामुळे या कॉटरवर शिपायांनी कब्जा केलेला आहे तर डे नाईट इतर कर्मचाऱ्यांच्या ड्युटी असताना दांड्या मारणाऱ्यांना स्टाफ नर्स पाठीशी घालत असल्यामुळेच दांड्या मारनारांची संख्या वाढलेली असून जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांनी चौकशी करून काम चुकारांना पाठीशी घालणाऱ्या टाफ नर्सवर निलंबनाची कारवाई करावी तर याप्रसंगी जिल्हाधिकारी व आरोग्यमंत्र्याकडे तक्रार करणार असल्याचे बोलले जात आहे . तर या ठिकाणी सुरळीत सेवा नागरिकांना उपस्थित करून द्यावी अशी मागणी नागरिकाकडून होत असताना समाजसेवक खिजर सौदागर यांच्याकडून होत आहे.
★ तलवाडा आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी कर्मचाऱ्याला राहण्यासाठी कॉटरची व्यवस्था केलेली असताना कर्मचारी मात्र तालुकावारी……
★ शिपाई आरोग्य केंद्राच्या कॉटरमध्ये तर अधिकारी तालुकावारी
★ स्टाफ नर्सला आर्थिक लाभ मिळत असल्यांने दांड्या मारणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार…? तर दांड्या मारणारांना या ठिकाणी वरिष्ठांच पाठबळ असल्याची ही चर्चा होत आहे.