20.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

*दिव्यात अनाधिकृत शाळा जोमाने सुरूच,शिक्षण विभाग चां कानाडोळा..*

*दिव्यात अनाधिकृत शाळा जोमाने सुरूच,शिक्षण विभाग चां कानाडोळा..*

 

अमित जाधव – प्रतिनिधि

 

 

राज्यातील विविध विभागात अनधिकृत शाळा सुरू राहिल्याचे तक्रारी शिक्षण संचालनालयाकडे येत आहेत. या तक्रारींची दखल घेत शिक्षण संचालनालयाने विभागात अनधिकृत शाळा सुरू राहून पालकांची फसवणूक झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी यापुढे तेथील विभागीय उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांची असणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

 

राज्यात मागील काही दिवस बोगस प्रमाणपत्र घेऊन अनधिकृतपणे शाळा चालवण्यात येत असल्याचे उघडकीस आले होते. त्याशिवाय, राज्यातील अनेक ठिकाणी अनधिकृत शाळांच्या मार्फत विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाते. या सगळ्या प्रकरणांची दखल घेत राज्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या संदर्भात शिक्षण संचालनालयाकडून पत्रक जारी करण्यात आले आहे. असे कडल निर्बंध असताना देखील दिव्यातील तीस ते चाळीस अनाधिकृत शाळा जोमाने सुरू आहेत यावर प्रशासन ठाणे शिक्षण विभागाकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाही असे काही पालक वर्ग व जैष्ठ शिक्षकांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.पालकांनी देखील आपल्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी म्हणून अनधिकृत शाळेत पाल्याचे प्रवेश करू नयेत असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या