27.5 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची कृषी प्रदर्शनाला भेट

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची कृषी प्रदर्शनाला भेट

 

जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मुलांची गेवराई विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन रुजवावा व विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी भविष्यात आधुनिक पद्धतीचा अवलंब करून जास्तीत जास्त भरघोस उत्पादन घेता यावे या उद्देशाने गेवराई येथे स्व. कृषीरत्न गणेशराव बेदरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ किसान कृषी विकास प्रतिष्ठान, गेवराई आयोजित 16 वे भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन या क्षेत्रभेटीदरम्यान कृषी प्रदर्शनात विद्यार्थ्यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी कृषी विज्ञान केंद्र खामगाव येथील स्टॉलला भेट दिली असता विद्यार्थ्यांना

ॲझोला निर्मिती संपूर्ण माहिती तसेच आधुनिक पद्धतीने तयार झालेले शेती उपयुक्त अवजारे व त्यांच्यापासून होणारा उपयोग शेती उपयोगी यंत्रे मल्चिंग गांडूळ खताचे महत्त्व व निर्मिती या विषयी माहिती पिकांना लागणाऱ्या अन्नद्रव्याचे महत्त्व पिकावरील कीड व रोग विषयी माहिती रोपवाटिका तंत्रज्ञान पिकास पाणी देण्याच्या आधुनिक पद्धती यामध्ये तुषार सिंचन ठिबक सिंचन तसेच भाजीपाला व फळपिके यांच्या भरघोस उत्पादन देणाऱ्या कृषी क्षेत्रातील विविध कंपन्या कंपन्यातील सर्वच तज्ञ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना कृषी या विषयी सखोल असे मोलाचे मार्गदर्शन केले या क्षेत्रभेटीचे आयोजन कृषी विभाग प्रमुख विलास पवार आणि परवेज पठाण शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार पोपळघट यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. या क्षेत्रभेटीदरम्यान शाळेतील सर्वच शिक्षक वर्ग यांचे सहकार्य लाभले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या