27.3 C
New York
Sunday, June 23, 2024

Buy now

एकताच्या संमेलनात ग्रामीण भागातील प्रतिबिंब उमटविण्याची ताकद-बाबा भांड* -कथाकथन,परिसंवाद, कविसंमेलन,ठराव वाचनाने संमेलनाचा समारोप-

एकताच्या संमेलनात ग्रामीण भागातील प्रतिबिंब उमटविण्याची ताकद-बाबा भांड* -कथाकथन,परिसंवाद, कविसंमेलन,ठराव वाचनाने संमेलनाचा समारोप-

 

शिरूर कासार(प्रशांत बाफना) :-(संत भागवत महाराज साहित्य नगरी, गोमळवाडा) वेदनेला फुंकर माणुसकीची हे ब्रीदवाक्य घेवून सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या एकता फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या संमेलनात ग्रामीण भागातील प्रतिबिंब उमटविण्याची ताकद असल्याचे प्रतिपादन संमेलनाचे उद्घाटक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा भांड यांनी केले. ते तालुक्यातील गोमळवाडा येथील संत भागवत महाराज साहित्य नगरीत एकता फाउंडेशन आणि गोमळवाडा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सहाव्या एकता मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात बोलत होते. या वेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ.भास्कर बडे, श्रीराम संस्थानचे महंत भानुदास महाराज शास्त्री, माजी संमेलनाध्यक्ष दिनकर जोशी, समाजकल्याणचे सहआयुक्त रविंद्र शिंदे, सेवानिवृत्त मुख्य अभियंता डी.जी.मळेकर, प्राचार्य डॉ.विश्वास कंधारे, स्वागताध्यक्ष आजीनाथ गवळी यांची उपस्थिती होती. एकता फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी दि.२१ व २२ रोजी ६ वे एकता मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. संमेलनाच्या दुसर्‍या दिवसाची सुरवात रक्तदान शिबिराने झाली. त्यानंतर उदगीरचे कथाकार अंबादास केदार यांच्या अध्यक्षतेखालील कथाकथन सत्रात प्राचार्य चंद्रशेखर कळसे (जळकोट), जी.जी.कांबळे(लातूर), अंकुश नागरगोजे(सौताडा), कु.कार्तिकी नेटके, कु.सानिका गुजर, चि.राज कांबळे यांनी दमदार कथा सादर केल्या. तद्नंतर ‘ग्रामीण भागातील वाढते बालविवाह व त्यावरील उपाय’ या विषयावरील परिसंवाद महिला किसान अधिकार मंचच्या मनिषा तोकले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यात अशोक तांगडे, तत्वशील कांबळे(बीड), प्राचार्य डाॅ.रामकिशन दहिफळे (संभाजीनगर) यांनी सहभाग नोंदवला. दुपारच्या सत्राची सुरुवात प्रा.डाॅ.प्रकाश वाकळे (परभणी) यांच्या अध्यक्षतेखालील काव्य संमेलनाने झाली. यात रामदास केदार, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, रसूल पठाण(उदगीर), चंद्रकांत मोरे(अहमदपूर), अंकुश सिंदगीकर(जळकोट), अशोक गुठे(हिंगोली), अंजली गवई(बीड), शोभा घुंगरे(परभणी), पु.ना.बारडकर(सेलू), देवीदास शिंदे, इम्रान शेख, मोहन शेळके(बालमटाकळी), पुनम राऊत(बोधेगाव), शहादेव सुरासे, चिराग फारूकी, नारायण कवले (पैठण), महेश मगर, वसंत अभंग, अविनाश बुटे, रामदास घोडके, प्रशांत ढाकणे(हातगाव), प्रिती टेकाळे(जळगाव), कु.आकांक्षा जगताप आदी कवी कवयित्रींनी उत्स्फूर्त रचना सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. या काव्यसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन पैठण येथील युवा कवी के.बी.शेख यांनी केले. समारोपामध्ये सन्मान भुमीपुत्रांचा या कार्यक्रमांतर्गत गोमळवाडा येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष साहित्यिक अनंत कराड, सचिव पत्रकार गोकुळ पवार आणि स्वागताध्यक्ष अजिनाथ गवळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

चौकट –

समारोप समारंभात एकता फाउंडेशन आणि गोमळवाडा ग्रामस्थांच्या वतीने पुढील ठराव मंजूर करण्यात आले. १)गोमळवाडा येथील ऐतिहासिक वस्तु व वास्तूंचे संशोधन आणि जतन करणे. २)वेगवेगळ्या नोंदणीकृत सामाजिक संस्थांनी आयोजित केलेल्या साहित्य संमेलनांना शासनाने निधी द्यावा. ३)अभ्यासक्रमातील कवितांचे ऑडिओ/व्हिडिओ स्वरूपातील पेनड्राईव्ह शासनाने प्रत्येक शाळांना पुरवावेत. ४)निवडक शालेय विद्यार्थ्यांच्या दर्जेदार कवितांचे तालुकानिहाय एक पुस्तक शासनस्तरावरून प्रकाशित करावे. ५)मराठी व्याकरण विषयक कार्यशाळा तालुकानिहाय आयोजित कराव्यात. ६)शिरूर तालुक्यातील सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरलेल्या सिंदफना मध्यम प्रकल्पाची उंची वाढवावी.

 

चौकट –

साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच कविसंमेलनाचे अध्यक्ष आणि कवी-कवयित्रींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कविसंमेलनाची सुरवात झाली. तद्नंतर जेष्ठ साहित्यिक ना.धो.महानोर, एकता परिवारातील सदस्य श्रावण गिरी आदी दिवंगत कवी, लेखकांना काव्य संमेलन सुरू होण्यापूर्वी श्रद्धांजली वाहण्यात आली.

 

चौकट –

एकता फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष साहित्यिक अनंत कराड लिखित, चपराक प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या ‘हे रामा..’ या काव्यसंग्रहाचे विमोचन एकता मराठी साहित्य संमेलनातील काव्य संमेलनात एकता फाउंडेशन केंद्रीय कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांसह निमंत्रित कवी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या