29 C
New York
Thursday, June 13, 2024

Buy now

पाटोदा न्यायालयात जागतिक मानवाधिकार दिन व राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा.

*पाटोदा न्यायालयात जागतिक मानवाधिकार दिन व राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा.*

 

*पाटोदा(दत्ता वाघमारे)*

विधी सेवा समिती व वकील संघ पाटोदा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानवाधिकार दिन व राष्ट्रीय ग्राहक दिन या निमित्त दिनांक 22/12/ 2023 रोजी कायदेविषयक जनजागरण शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटोदा दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती एस.एन.निकम मॅडम या उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून पाटोदा दिवाणी न्यायालयाच्या सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती ए.ए. पाटील मॅडम तसेच पाटोदा वकील संघाचे अध्यक्ष. अॅड.सुशील कोठेकर हे उपस्थित होते.

कायदेविषयक जनजागरण शिबिरामध्ये कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.सुशील कोठेकर यांनी केले तर जागतिक मानवाधिकार या विषयावर अॅड.ए.एस. वैद्य साहेब यांनी मार्गदर्शन केले तर राष्ट्रीय ग्राहक दिन निमित्त ग्राहकांचे अधिकार काय? तसेच ग्राहक संरक्षण कायदा याविषयीचे सविस्तर मार्गदर्शन पाटोदा दिवाणी न्यायालयाच्या सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती पाटील मॅडम यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन केले याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अड.एस.बी.जावळे साहेब यांनी केले या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पक्षकार तसेच वकील संघाचे सर्व सन्माननीय सदस्य व पाटोदा न्यायालयाचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या