25.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनानिमित्त बीडमध्ये होणार ‘नाट्यकलेचा जागर’

शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनानिमित्त

बीडमध्ये होणार ‘नाट्यकलेचा जागर’

 

अ.भा.नाट्य परिषदेच्या बीड शाखा अध्यक्ष डॉ. दिपा क्षीरसागर यांची माहिती; नाव नोंदणी करण्याचे आवाहन

 

बीड (प्रतिनिधी)

दि.22 : रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई आयोजित नाट्य संस्कृती लाभलेल्या महाराष्ट्र राज्यात मानाचे शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जानेवारी ते मे 2024 या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने धुमधडाक्यात साजरे होणार आहे. या संमेलनाचा महत्वाचा भाग म्हणून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात कलावंत, नाट्यकर्मीसाठी नाट्यकलेचा जागर हा स्पर्धात्मक महोत्सव दि.15 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व कलावंतानी भाग घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बीड शाखा अध्यक्ष डॉ.दिपाताई क्षीरसागर यांनी केले आहे.

 

बीड येथील केएसके महाविद्यालयात शुक्रवारी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.संजय पाटील देवळाणकर, भरत लोळगे, प्रा.विद्यासागर पाटांगणकर, कुलदीप धुमाळे, डॉ.सतीष साळुुंके, डॉ.उज्वला वनवे, मिलींद शिवणीकर, डॉ.दुष्यंता रामटेके, डॉ.अनिता शिंदे, लक्ष्मीकांत दोडके, सुरेश साळूंके, राहूल पांडव, डॉ.विजय राख, अक्षय फुलझळके आदींची उपस्थिती होती.

 

पुढे बोलताना डॉ.दिपाताई क्षीरसागर म्हणाल्या, नाट्यकलेचा जागर हा स्पर्धात्मक महोत्सव महाराष्ट्रातील विविध 22 केंद्रावर रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, बीड, नांदेड, लातूर, छत्रपती संभााजीनगर, अकोला, अमरावती, नागपूर, पंढरपूर, वाशिम, ठाणे, नवी मुंबई, मुंबई येथे होणार आहे. यात एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नाट्यअभिवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा प्राथमिक उपांत्य व अंतिम फेरी अश्या तीन फेर्‍यामध्ये होणार आहे. येत्या दि.15 जानेवारीपासून प्राथमिक फेरी सुरू होऊन यातील निवडक कलाकृतीची उपांत्य फेरी घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई येथे अंतिम फेरी होणार आहे. अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी 4 दिवसीय नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे शिबिर नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री घेणार असून अंतिम फेरीतील सादरीकरणाचा दर्जा यामुळे सर्वोत्तम असणार आहे. बीड येथे नाट्यकलेचा जागर हा दि.24, 25, 26 जानेवारी 2024 या कालावधीत बीड शहरातील यशवंतराव नाट्यगृह व के.एस.के.महाविद्यालयाच्या प्रांगणात स्पर्धा होणार आहेत. सर्व स्पर्धेची माहिती, नियमावली व प्रवेश अर्ज डब्ल्युडब्ल्युडब्ल्यु डॉट नाट्यपरिषद डॉट ओआरजी (www.natyaparishad.org)या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दि.31 डिसेंबर 2023 सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. प्रवेश प्रक्रिया केवळ ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यानंतर आलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. दरम्यान, व्यावसायिक कलावंताबरोबर प्रथमच महाराष्ट्रातील सर्व गुणवंत कलाकारांना 100 व्या नाट्यसंमेलनात आपली कला सादर करण्याची संधी या ‘नाट्यकलेचा जागर’मधून मिळणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, कलावंतानी, शाळा, संगीत विद्यालय, महाविद्यालय, हौशी संस्था, विद्यापीठाच्या इतर महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नाट्य परिषदेच्यावतीने डॉ.दिपाताई क्षीरसागर यांनी केले आहे.

 

चौकट

अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

 

नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सवात सहभागासाठी व अधिक माहितीसाठी बीड केंद्र प्रमुख डॉ.दिपाताई क्षीरसागर, सहकेंद्रप्रमुख डॉ.संजय पाटील देवळाणकर 9422295314, संपर्क प्रमुख प्रा.मिलींद शिवणीकर 9422930490, डॉ.दुष्यंता रामटेके 9767355294, डॉ.विजयकुमार राख 9833345809, डॉ.रूक्मिनीकांत पांडव 9421515244 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

चौकट

प्राथमिक फेरीतील पारितोषिके

 

प्राथमिक फेरीतील एकांकिका व बालनाट्य स्पर्धेच्या फेरीचे पारितोषिके 11 हजार प्रथम, 7 हजार द्वितीय, 5 हजार तृतीय आणि प्रमाणपत्र असे आहे. तर एकपात्री अभिनय, नाट्यसंगीत पदगायन स्पर्धा, नाट्यछटा व नाट्य अभिवाचन स्पर्धेत 3, 2, 1 हजार व 500 रुपये अनुक्रमे रोख पारितोषिके व प्रमाणपत्र असणार आहे.

 

चौकट

अंतिम स्पर्धेची रोख पारितोषिके

 

एकांकिका स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट 2 लक्ष रुपये (खास स्पर्धेसाठी लिखान केलेल्या एकांकिकेस) अथवा सर्वोत्कृष्ट 1 लक्ष रुपये, उत्कृष्ट 75 हजार रुपये, उत्तम 50 हजार रुपये, दोन उत्तेजनार्थ पारितोषिके 25 हजार रुपये. बालनाट्य स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट 75 हजार, उत्कृष्ट 50 हजार, उत्तम 25 हजार, तीेन उत्तेजनार्थ 10 हजार रुपये. अभिवाचन स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट 25 हजार, उत्कृष्ट 15 हजार, उत्तम 10 हजार, दोन उत्तेजनार्थ 5, हजार. नाट्य संगीत पद गायन स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट 25 हजार, उत्कृष्ट 15 हजार, उत्तम 10 हजार, दोन उत्तेजनार्थ 1 हजार. एकपात्री/नाट्यछटा स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट 15 हजार, उत्कृष्ट 10 हजार, उत्तम 5 हजार, दोन उत्तेजनार्थ अडीच हजार रुपये. लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, स्त्री अभिनय, पुरूष अभिनय वैयक्तिक रोख पारितोषिके (एकांकिका स्पर्धासाठी) 15 हजार, 10 हजार, 5 हजार व स्मृतीचिन्ह बालनाट्य स्पर्धेसाठी साडेसात हजार, 5 हजार, अडीच हजार रुपये देण्यात येणार आहेत. दरम्यान, स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत देखील भरघोस अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी कलावंत, तंत्रज्ञ यांना सहभाग पत्र देण्यात येणार आहे. एकांकिकेसाठी प्रवेश फी 1 हजार रुपये तर बालनाट्यासाठी 500 रुपये व इतर सर्व स्पर्धेसाठी 100 रुपये राहील. यासाठी बँकेचा खाते क्रमांक 015310110003693 आयएफएससी कोड बीकेआयडी0000153. बँक ऑफ इंडिया, शिवाजी पार्क, मुंबई आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या