शेवगाव (प्रशांत बाफना )शेवगाव शहरातील क्रांती चौकात वाहतूक ठप्प होते. वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची आहे. त्यांनी त्यांची जबाबदारी प्रामाणिक पणे पार पाडली तर वाहतूक ठप्प होणार नाही. मात्र वाहतूक पोलीस क्रांती चौकात ड्युटीवर थांबत नाही. वारंवार वाहतूक ठप्प होते. कारवाई वाहतूक पोलिसांवर झाली पाहिजे. मात्र शेवगाव ला असं होत नाही. रस्त्याच्या बाजूला फळ विक्रेते, खादय पदार्थ विक्रेते यांच्यावर च कारवाई केली जाते. हे धोरण चुकीचे आहे. फेरीवाले प्रत्येक गावात, तालुक्यात, जिल्ह्यात आहेत. फेरीवाल्या ना शिस्त लावलीच पाहिजे. त्यांच्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असेल तर त्यांच्या वर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. पण त्यांची उपासमार होऊ नये. याची खबरदारी सुद्धा घेतली पाहिजे.
शेवगाव शहरातील क्रांती चौकात एस. टी. बस स्थानक आहे. याचं परिसरात जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा आहे. विविध कार्यकारी सोसायटी आहे. स्वस्त धान्य दुकान आहे. शाळेच्या परिसरात रस्त्याच्या बाजूला अनेक वर्षा पासून फळ विक्रेते, वडापाव विक्रेते, आईस्क्रीम, बटरपावं विक्रेते हातगाडी लावून व्यवसाय करतात. सदर व्यावसायिक सर्व सामान्य कुटूंबातील बेरोजगार आहेत. नोकरीं मिळत नाही म्हणून छोटासा व्यवसाय करून उपजीविका करीत आहेत. मात्र काही महिन्या पासून या व्यावसायिकांना या परिसरात व्यवसाय करण्यास प्रतिबंध घातल्यामुळे त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे. नगरपरिषदेकडून त्यांच्या कडून कर वसूल केला जातो. दररोज नगरपरिषदे कडून कर वसूल केला जातो. आता मात्र वाहतूक ठप्प होते असे सांगून या व्यावसायिक लोकांना हाकलून दिले जाते. हे चुकीचं आहे. ते काही रस्त्यावर बसून मावा विकत नाही. मटका व्यवसाय करत नाहीत. जुगार अड्डा चालवत नाहीत. ते वडा पाव, फळ विक्रेते आहेत. शेवगाव शहरातील नागरिक आहेत त्यांचा शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी सहानुभूती पूर्वक विचार करण्याची गरज आहे. फेरीवाले फक्त शेवगाव मध्ये नाहीत सर्व च ठिकाणी आहेत. ते व्यवसाय करतात. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक ठप्प होते म्हणून नगरपरिषद प्रशासनाने फेरीवाल्याना, रिक्षा चालकांना हुसकावून लावले होते. मात्र काही सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी यांनी हस्तक्षेप केल्या नंतर या परिसरात रिक्षा चालक, फेरीवाल्या ना परवानगी मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील फेरीवाले व क्रांती चौकातील फेरीवाले यांच्यात भेदभाव का केला जातो? शेवगाव शहर व परिसरातील दुचाकी वाहने पार्किंग ची व्यवस्था करण्याची जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची आहे. त्यांनी पे पार्किंग ची व्यवस्था केली तर आर्थिक उत्पन्न मिळेल. वाहतूक ठप्प होणार नाही. या साठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
शेवगाव शहरात धन दांडग्या लोकांनी नगरपरिषद मालकीच्या जागेवर अतिक्रमण खुले आम केलेले आहेत. त्यांच्या वर कोणतीच कारवाई होत नाही. मात्र हातावर पोट भरणारे फेरीवाले यांच्यावर अन्याय केला जातो हे कितपत योग्य आहे. या फेरीवाले लोकांना नगरपरिषद गाळे बांधून देत नाही. रीतसर भाडे भरून फेरीवाले व्यवसाय करतील.
शेवगाव शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, कमीत कमी जागेत व्यवसाय करतील असे हमीपत्र घेऊन फेरीवाले लोकांना सहकार्य करण्याची गरज आहे. मुलांचं शिक्षण, मुलींचे लग्न, व्यवसाय साठी बँकेकडून घेतलेले कर्ज, बचत गटाचे कर्जाचे हप्ते याचं व्यवसाय तुन हे लोकं भरत असतात. प्रामाणिक पणे व्यवसाय करून पोटाची खळगी भरणाऱ्या फेरीवाल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे नेते यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. कॉम्रेड संजय नांगरे यांनी वेळोवेळी फेरीवाले लोकांची साथ दिली आहे. आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी सन्घटना, मनसे, वंचीत बहुजन आघाडी इ. सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन फेरीवाले लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. हातगाडी ला जागा जास्त लागते. ते लोकं छोटा टेबल वर फळ विक्री करतील. त्यांच्या दुकाना समोर दुचाकी उभ्या राहणार नाही याची जबाबदारी वाहतूक पोलिसांनी घेतली तर तोडगा निघू शकतो. त्या साठी फार मोठं आंदोलन करण्याची गरज नाही. अधिकारी व फेरीवाले यांच्यात सकारात्मक चर्चा झाली तर तोडगा निघू शकतो. राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या समस्या ची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.