20.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

कासारी गावात आढळला बिबट्या. गावच्या परिसरात आतापर्यंत पहिल्यांदा दिसला बिबट्या

प्रतिनिधी –  कासारी गावात आढळला बिबट्या. गावच्या परिसरात आतापर्यंत पहिल्यांदा दिसला बिबट्या. केज तालुक्यातील कासारी शिवारात आज सायंकाळी सव्वा सात वाजताच्या दरम्यान गायरान परिसरात एक बिबट्या नागरिकांना दिसला. गावातील सर्व लोक सतर्क असून वन विभागाच्या अधिकाऱ्याने देखील लक्ष देण्याची गरज आहे. तसं कासारी गाव पाहायला गेलं तर केज तालुक्यात येत. मात्र त्याला धारूर तालुका पोलीस स्टेशन आहे. कासारीचा संपूर्ण परिसर हा धारूर पोलीस ठाण्याअंतर्गत आहे. वन विभाग धारूर या ठिकाणी असून वन विभागाने आता लक्ष देण्याची गरज आहे. कासारी गावातील अनेक लोक वस्ती तांड्यावर राहतात. पशुधन आहे त्याचबरोबर पिकांना पाणी देण्यासाठी अनेक शेतकरी शेतात असतात कारण मध्यरात्री लाईट येत असल्याने बोर विद्युत विहिरीतले मोटर चालू करण्यासाठी शेतकरी मध्यरात्रीच शेतात असतो. त्यामुळे कासारी गावातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये सध्या तरी भीती निर्माण झालेली आहे. वेळीच शासन प्रशासनाने पावले उचलली गेली पाहिजेत. याच परिसरात रानडुक्कर देखील हरण देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. कासारी ग्रामपंचायत च्या माध्यमातून आम्ही गावातील लोकांची शंभर टक्के काळजी घेतच आहेत मात्र शासन प्रशासन सुद्धा नागरिकांची काळजी घेणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या