जाळपोळ, दगडफेक प्रकरणात आ.क्षीरसागरांची दुट्टपी भूमिका- अनिलदादा जगताप
बीड, प्रतिनिधी- बीड शहरात झालेल्या दगडफेक, जाळपोळ प्रकरणात आमदार संदीप क्षीरसागर यांची दुट्टपी भूमिका असल्याचे आता मराठा समाजासमोर आले आहे. आ क्षीरसागर आपल्या सोयीनुसार प्रत्येक वेळेस गिरगिटाप्रमाणे रंग बदलताना दिसून येत आहेत. अधिवेशनामध्ये व यापूर्वीही मराठा आरक्षणावर ब्र शब्दही आमदारांनी काढला नाही. प्रत्येक वेळेस त्यांनी फक्त मता पुरतं मराठा समाजाचा वापर केला गेला आहे. याच्यावरूनच आमदार किती मराठा दोषी आहेत हे लक्षात येते. यामुळे मराठा समाजात संताप व्यक्त केला जात आहे. मी जाळपोळीचा समर्थन करणार नाही परंतु नाहक मराठा समाजाला गुंतवण्याचा प्रयत्न जर आमदार करत असेल तर त्यांना मराठा समाज कदापिही माफ करणार नाही कारण एसआयटी स्थापन केल्यानंतर सर्वसामान्यांना याचा नाहक त्रास होणार आहे.
30 ऑक्टोबर रोजी माजलगावसह बीडमध्ये दगडफेक, जाळपोळीची घटना घडली. यामध्ये राष्ट्रवादी कार्यालयासह क्षीरसागरांच्या घरासमोरील काही वाहने जाळण्यात आली. यावेळीही आ.संदीप क्षीरसागर यांनी पोटात एक व ओठात एक अशी भूमिका घेतली होती. आता तर हिवाळी अधिवेशनामध्ये आपली मराठा समाजाबदल किती आस्था आहे हे भूमिका मांडत एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली. एसआयटी स्थापन झाल्यास या गुन्ह्याच्या तपासात सर्वसामन्याना व त्यातली त्यात मराठा समाजाला नाहक त्रास होणार आहे. या त्रासाला पुर्णतः आ. क्षीरसागर जबाबदार असतील. येणाऱ्या काळात मराठा समाज त्यांना त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.
—————-