नागपूर हिवाळी अधिवेशनात बीड जिल्ह्यातील जाळपोळ प्रकरणी पडसाद उमटले तर एसपीं नंदकुमार ठाकूर यांनी अधिकारी- ठाणेप्रमुखांची बैठक; बैठकीला मराठा आरक्षणादरम्यान दाखल असलेल्या गुन्ह्याच्या ठाणेप्रमुखांना प्राधान्य; प्रत्येक गुन्ह्यातील तपासाची घेतली माहिती
बीड प्रतिनिधी – (सायं दैनिक महाराष्ट्र आरंभ): बीडच्या जाळपोळ घटनेचा भडका नागपूर अधिवेशनात उडाल्यानंतर आज जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि ठाणेप्रमुखांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीला खासकरून जाळपोळ घटनाक्रमादरम्यन ज्या ठाणेअंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत त्या ठाणेप्रमुखासह तपासी अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले आहे. संबंधित प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला आहे, फरारी आरोपींचा शोध का लागत नाही? ज्या लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यातील किती लोक खरच इनोसंट आहेत का? यासह अन्य बाबींवर महत्वपुर्ण चर्चा होत एसपी माहिती घेत असल्याचे सांगण्यात येते.
बीड जिल्हा्यातील जाळपोळीच्या प्रकरणाचे पडसाद काल नागपूरच्या
हिवाळी अधिवेशनात उमटले. पोलिसांच्या उपस्थितीत जाळपोळ झाली.
जाळपोळ होत असताना पोलिसांनी हस्तक्षेप का केला नाही? त्यांचे हात
कोणी बांधले होते? इथपासून बीडच्या एसपींना बीडमध्ये काही तरी
होणार होते हे आधीच माहित होते. बीडचे एसपी बीड शहर जळत
असताना माजलगावमधून बीड शहरात का आले नाही? असे एक ना
अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. त्या प्रकरणात एसआयटी
स्थापन करण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी केली त्याचबरोबर या प्रकरणात
एखादा इनोसंट अडकलेला असेल तर तशा व्यक्तीला या प्रकरणातून
सुखरूप बाहेर काढण्याबाबतचे भाष्य गृहमंत्री फडणविसांनी केले. काल
हे सर्व अधिवेशनात घडल्यानंतर आज जिल्हा पोलीस अधिक्षक
नंदकुमार ठाकूर यांनी बीड पोलीस दलाची महत्वपुर्ण बैठक बोलवली.
दुपारी बारा वा. पासून ही बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातील
पोलीस अधिकाऱ्यांपासून ठाणेप्रमुखांना बोलवण्यात आले आहे
विशेषतः गेल्या दोन महिन्याच्या कालखंडात मराठा आंदोलनाच्या
दरम्यान ज्या ज्या ठाण्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत त्यातील
ठाणेप्रमुख, तपासी अधिकारी यांना प्रामुख्याने बोलवण्यात आल्याचे
समजते. जाळपोळीसह अन्य प्रकरणात जे गुन्हे दाखल झालेले आहेत
त्याचे सध्याचे स्टेटस काय? जाळपोळ प्रकरणात जे आरोपी फरारआहेत ते अद्याप का सापडले नाहीत? तपास कुठपर्यंत आला आहे? ज्याआरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यांना अटक झाली आहेत्यामध्ये खरच एखादा दुसरा इनोसंट आहे का? यावरही चर्चा होऊन एसपींनी माहिती घेतल्याचे समजते. अद्याप ही बैठक सुरू होती .