प्रतिनिधी –
ॲट्रॉसिटी व अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकारणातील मुख्य आरोपीस मा. सत्र न्यायालाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
तलवाडा,(प्रतिनिधी) अल्पवयीन मुलगी अनुसूचित जाती मधील आहे हॆ माहित असतांना सुरुवातीला तिच्या अल्पवयाचा फायदा घेऊन तिला पाण्यातून झोपेची गोळी देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले तसेच तिचे फोटो काढून तिला वारंवार बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकारणातील मुख्य आरोपीस मा. सत्र न्यायालाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या बाबत सविस्तर माहिती अशी कि,दिनांक 20/11/2023 रोजी ता.आष्टी येथील एका महिलेने अंभोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की,फिर्यादी ही अल्पवयीन असतांना आरोपी नामे सागर सहदेव रक्कटे रा. लोणी सय्यदमीर ता. आष्टी याने तिला त्याच्या घरी बोलून घेतले व तिला पाण्यातून झोपेची गोळी देऊन तिला बेशुद्ध करून तिच्या संमती शिवाय तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले व तिचे फोटो मोबाईलमध्ये काढले व सदर काढलेल्या फोटो आधारे तो तिला सन 2018 पासून तिची बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यावर सतत बलात्कार करत होता. सन 2022 मध्ये फिर्यादी हिचे लग्न झाल्यानंतर सुद्धा आरोपी हा तिला त्रास देत होता व त्याने फिर्यादी हिच्या पतीला तिचे फोटो इंस्टाग्राम पाठवून तिची बदनामी केली. फिर्यादी हिने पतीला त्याबाबत सांगितले. तसेच ती अनुसूचित जातीमधील मुलगी आहे हॆ माहित असतांना सुरुवातीला तिच्या अल्पवयाचा फायदा घेऊन तिला पाण्यातून झोपेची गोळी देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले तसेच तिचे फोटो काढून तिला वारंवार बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यावर सतत बलात्कार अशी फिर्यादी दिली.सदर फिर्यादी वरून आरोपी सागर याच्या विरुद्ध कलम 376,376(2)(n),376(2)(j)506 भा. द. वि. आणि कलम 4,6,12 पॉस्को कायदा व कलम 3(1)(r)(s),3(1)(w)(i)(ii),3(2)(va),3(2)(5)ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला.सदर आरोपी सागर याचा अटकपूर्व जामीन अर्ज मा सत्र न्यायालयात ॲड. सचिन आबूज यांनी दाखल केला. सदर अर्जावर फिर्यादी, पोलीस यांचे म्हणणे व युक्तीवाद मा. न्यायालयात झाला. आरोपीचे वकील ॲड. सचिन आबूज यांनी घेतलेला बचाव आणि केलेला युक्तीवाद व तपासात आलेला पुरावा पाहून मा. सत्र न्यायाधीश नं.1,बीड यांनी आरोपी सागर यास अटकपूर्व जामीन मंजूर केला.
सदर प्रकरणात आरोपी सागर याच्या याच्यावतीने बीड येथील ॲड. सचिन आबूज काम पहिले. त्यांना आष्टी येथील जेष्ठ वकील पारखे यांनी मार्गदर्शन व अभिजीत गलधर आणि हर्षल बहीर यांनी सहकार्य केले.