तलवाडा आरोग्य केंद्रात औषधाचा तुटवडा रुग्णांना सुविधा मिळेना ; ड्युटी एकाची काम करतो दुसराच–शिंगने,शेख.
प्रतिनिधी- (सायं दैनिक महाराष्ट्र आरंभ )तलवाडा तालुक्यातील तलवाडा प्रथमिक आरोग्य केंद्र सध्या सलाईनवर असून या ठिकाणचे अधिकार्यांच्या दुर्लक्षा मुळे या ठिकाणी औषधाच्या तुटवडा रुग्णांना खाजगी मेडिकल वरून औषधी सांगण्यात येत असल्याने रुग्णात संताप निर्माण होत असताना या ठिकाणी रात्र पाळीला ड्युटी एकाची तर काम करतो दुसराच असा प्रताप तलवाडा आरोग्य केंद्रांत होत असून या ठिकाणी कामचुकार कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार वैद्यकीय अधिकारी व सुपरवायझर कडून होत असल्याने नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत आहे असून या प्रकरणी वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी जयदेव शिंगणे कडून मागणी होत आहे.
तालुक्यातील सर्वात मोठे रुग्णालय म्हणून तलवाडा येथील प्रथमिक आरोग्य केंद्राकडे पाहण्यात येत असताना या ठिकाणी तलवाडासह परिसरातील 15 ते 20 गावच्या नागरिकांचा संपर्क येत असताना या ठिकाणी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नाहीत जे वैद्यकीय अधिकारी दोन आहे ते कायमस्वरूपी नसून टेम्परवारी आहेत तर या ठिकाणी रोज शंभर ते दोनशे रुग्ण उपचारासाठी येत असताना या रुग्णालयात गेल्या अनेक दिवसापासून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आरोग्य केंद्राची वाता हात झालेली असून या ठिकाणी रुग्णाला औषधी मिळत नाही त्यामुळे रुग्णांना बाहेरून खाजगी मेडिकलून औषध उपचार विकत आणावा लागत आहे.
भव्य दिव्य अशी असणारे हे रुग्णालय असून या ठिकाणी जर रुग्णाला वेळेवर औषध उपचार आणि सेवा मिळत नसेल तर काय कामाचे आहे अनेक वेळा या ठिकाणचे वैध्यकिय अधिकारी या ठिकाणी राहत नसल्यामुळे ते रुग्णांना रेफर करत आहेत तर अनेक कर्मचाऱ्यांना या ठिकाणी ड्युटी लावण्यात आलेले असताना ते कर्मचारी कधीतरी दिवसा ड्युटी करतात व संध्याकाळी दुसऱ्या कर्मचाऱ्याला आपले काम पाहण्यासाठी सांगत असल्यामुळे दुसरा कर्मचारी मात्र राम बोरसे कारभार करत असल्यामुळे अनेक वेळा या ठिकाणच्या रुग्णांना खाजगि ठिकाणी उपचार घेण्यासाठी भाग पाडावे लागत असल्यामुळे हे रुग्णालय आहे की एक प्रकारे जनावराचा दवाखाना आहे असा प्रश्न याठिकाणी होत आहे तर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते रमेश नाटकर, शेख खिजर सौदागर ,
जयदेव शिंगणे आदींनी या ठिकाणी येऊन नागरिकांच्या तक्रारून पाहाणी केली असताना या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी कमी पण खाजगी लोक या ठिकाणी ज्यादा प्रमाणात असल्याचे त्यांनी फोटो शूट केल्यावरून दिसून येतात तर या प्रकरणी त्यांनी संबंधितांना सांगितले असता उलट पक्षी अधिकाऱ्याने एक प्रकारे चौकशी करून त्यांना कोणावर कारवाई करावी असे सांगितले त्यामुळे उलटा चोर कोतवालको डाटे अशा प्रकारे या ठिकानी आरोग्य केंद्रांत सुरू असल्याचे शेख खिजर सौदागर यांनी बोलताना सांगितले.
या ठिकाणी काम करणारे वैद्यकीय कर्मचारी शिपया पासून तर वरिष्ठ डॉक्टर पर्यंत एकही उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना व्यवस्थित बोलत नाही तर आमंच काय वाकड होत नाही अशा प्रकारे या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून काम करणाऱ्या शिपाई कडून बोलले जात असून ते या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना एक प्रकारे तोर्यात बोलत असून ते एक प्रकारे राजकीय पुढाऱ्यांचे हस्तक असल्यामुळेच असा प्रकार या ठिकाणी होत असल्याचे संबंधित समाजसेवक बोलत आहेत.
शासनाकडून आरोग्य केंद्रासाठी लाखो रुपयांच्या निधी येत असताना या ठिकाणी त्या निधीचा योग्य प्रकारे खर्च होत नसल्याची सध्या तलवाडा गावात चर्चा होत असून निधी जर पुरेपूर रुग्णासाठी वापरला जात असेल तर या ठिकाणी औषधे इतर साहित्याचा तुटवडा…? रुग्णांना बाहेरून औषधी खरेदी करावे लागत असतील तर येणारा निधी जातो कुठे..? या सर्वाला कारणीभूत कोण असाही प्रश्न निर्माण होत असताना या ठिकाणी इन्चार्ज असणारे डॉक्टर बनसोडे , सुपरवायझर, क्लर्क यांच्यामुळेच या आरोग्य केंद्राची वाताहात झाली असून या ठिकाणी रुग्णांना सुविधा मिळत नाहीत अशा प्रकारच्या तक्रारी सध्या या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णाकडून होत आहे असे सामाजिक कार्यकर्ते रमेश नाटकर म्हणाले.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तलवाडा प्रथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे जर रुग्णांना वेळेवर सेवा मिळत नसतील तर असून काय फायदा त्यामुळे ड्युटी असताना काम न करता इतरांना काम सांगणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी व या ठिकाणी असलेल्या त्रुटीची तात्काळ दखल घेऊन संबंधित वैद्यकीय अधिकारी व इतरांवर कायदेशीर कारवाई करावी या ठिकाणाहून त्यांची तात्काळ बदली करावी व ढेपळलेल्या कारभार सुधारण्याचा प्रयत्न करावा नसता रस्त्यावरून आंदोलन करण्यात येईल असे नागरिकात बोलले जात आहे.