20.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र इंगळे यांना जिवे मारण्याची धमकी

सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र इंगळे यांना जिवे मारण्याची धमकी

 

नरेंद्र इंगळे हे एक समाज कार्यकर्ता असून………………….

एका वर्षापूर्वी नरेंद्र इंगळे यांची चूक नसताना चंदन दयाराम घटे या व्यक्तीने दि. १२ जुलै २०२२ रोजी यांना जातीवादी शिवीगाळ करून काठीने मारहाण केली व तेव्हा नरेंद्र इंगळे हे बाळापूर पोलीस स्टेशन ला तक्रार करायला गेले असता तेव्हा त्यांचं मेडिकल पण झालेलं होत परंतु गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने मला समजावून सांगितले कि केस करू नको व चंदन घटे त्यानां माझ्या पाया पडून माफी मागायला लावली.या गोष्टीची खुन्नस मनामध्ये धरून तो व्यक्ती नरेंद्र इंगळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून म्हणजे तू ढेडल्या मला पोलीस स्टेशनला माफी मागायला लावली आता तुला तर जिवंत सोडणार नाही. माझं एक एकर गेलं तरी चालेल आणि तुला खोट्या केसमध्ये फसवणार व माझे नावही कुठेही येणारं नाही कारण चंदन घटे हा व्यक्ती नेहमी बिमारीचे नाटक करून खोटे मेडिकल रिपोर्ट बनून आणतो. आणि लोकांना सांगतो की मी बिमार आहे याच गोष्टीचा फायदा घेऊन तो या प्रकरणातून निघण्याचा पर्यन्त करत आहे. आणि तो हे सगळं नरेंद्र इंगळे यांना बोलून दाखवलं आहे की माझ्या जवळ पैसा आहे आणि पोलीस स्टेशनला माझी खूप ओळखी आहे. ह्या प्रकरणामुळे नरेंद्र इंगळे यांना मानसिक त्रास देत असल्याने ते ६ ते ७ महीने गावा बाहेर राहीले. काही महिन्यानंतर गावात आल्यावरही चंदन घटे इसम पुन्हा त्याच प्रकारे त्रास देत होता 20 जुलै 2023 ला पारस पोलीस चौकी ला लेखी तक्रार मागे घेतली तिसऱ्यादा चंदन घटे हे तिथेही हजर राहिले नाही त्यांनी बिमारीचे नाटक केल आणि चंदन घटे यांची पत्नी पारस पोलीस स्टेशन ला आल्या होत्या. आणि त्यांनी आपल्या पती विषयी हमी दिली की आता यापुढे माझ्या पती कडून कुठलाही त्रास नरेंद्र इंगळे यांना होणार नाही. त्यामुळे इंगळे यांनी केस परत मागे घेतली परंतु त्यानंतर हा विषय अजुन गंभीर झाला. नरेंद्र इंगळे हे गल्लीतून जाता येतांना त्यांना बघून जातीय शिवीगाळ करणं व जिवंत मारण्याच्या धमक्या देणे हा प्रकार चंदन घटे या व्यक्तीकडून सुरूच आहे. या गोष्टीमुळे नरेंद्र इंगळे पूर्ण पणे वैतागले आहे त्यांना कुठलेही काम करता येत नसल्यामुळे सतत ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होत असल्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता परंतु त्यांनी स्वतःला सावरले व विचार केला मी मेलो तर त्या व्यक्तीला चांगलंच होईल पण नुकसान स्वतःच आणि दुःख घरच्यांना होईल. तरीही यांना न्याय मिळेल या प्रतीक्षेत ते आहेत. कारण संबंधित व्यक्तीवर अजूनही कारवाही झालेली नाही. त्याची कसल्याही प्रकारे चौकीशी झाली नाहीत्यामुळे त्याचा आजही तो मानसिक त्रास दिला जात आहे.१६ ऑक्टोंबर ला लेखी तक्रार केली आहे. पोलीस प्रशासनावर माझा विश्वास आहे मला न्याय मिळेल या प्रतीक्षेत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या