28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

जेव्हा “राजगृहा”वरून भेटीचं निमंत्रण येतं (डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास स्थान)

जेव्हा “राजगृहा”वरून भेटीचं निमंत्रण येतं

(डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास स्थान)

.

….. प्रतिनिधी -गुरवारी ( 6 डिसेंबर 2023) दिवसभर शेतातल्या कामाची खूप दगदग झालेली. रात्री आठला जेवण झाल्यावर लगेच अंथरून…. पाच-दहा मिनिटात झोप लागलेली…

सकाळी मोबाईल पाहिला तर रात्री 8.30 नंतर अनेक मिसकाॅल पडलेले…. त्यात एक वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील साहेब यांचा मिसकाॅल होता. संत साहित्य संमेलनासंबंधी काही असावं म्हणून पहिला फोन त्यांना केला….

“महाराज, परवा दिनांक 8 डिसेंबर रोजी मुंबई आझाद मैदान येथे इझ्रायल आणि पॅलेस्टिन दरम्यान सुरू असणारे युद्ध थांबून तिथे शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी सर्व धर्मातील धर्म गुरूंची “शांती सभा” वंचित बहूजन आघाडीच्या वतीने आयोजित केली आहे. त्यात वारकरी संप्रदायाच्या वतीने आपण सहभागी व्हावे. आपण वारकरी संतांचा शांतीचा संदेश नीट मांडू शकाल. तुम्ही येताय असं मी अॅड. प्रकाश आंबेडकर यांना कळवितो.”

मला मध्ये काही बोलण्याची संधी न देता नेहमीप्रमाणे त्यांनी आदेश काढला. त्यांनी मध्ये थोडा पाॅझं घेताचं कधी नव्हे ते धाडसं करून “मला जाता येणारं नाही, कारण आळंदीत संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्यासाठी मी निघालो आहे” असे सांगितले.

त्यावर ते म्हणाले, “एकदशी 9 ला आहे. सभा 8 ला आहे. काही कारण सांगू नका. शांती सभा आटोपून मुंबईवरून आळंदीला या. मी अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना काॅलवर घेतो….. मला बोलण्याची संधी न देता त्यांनी काॅन्फरन्स काॅल जोडाला…..

“साहेब ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर काॅलवर आहेत… ते संविधानाचे कीर्तन करतात, समाजातील जात-धर्मावरून संघर्ष होऊ नये असा संदेश संत वचनाच्या आधारे कीर्तनातून देतात…. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ते कीर्तनातून जनजागृती करतात… वगैरे वगैरे…. माझी ओळख करून दिली….. मी पुन्हा काॅन्फरन्स काॅलवर बोलतानाही शांती सभेला येणं अवघड असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आंबेडकर साहेब यांनी इझ्रायल-पॅलेस्टिन यांचा संघर्ष, जागतिक पातळीवर त्याचे परिणाम, या काळात शांतता प्रिय लोकांनी भूमिका घेण्याची आवश्यकता हे सर्व अगदी खुलासेवार समजून सांगितले…..

…. मग माझा नाविलाज झाला आणि मी शांती सभेला जाण्याचे मान्य केले.

……. 8 डिसेंबर रोजी सभेच्या ठिकाणी पोहचलो. मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन धर्मातील धर्म गुरू उपस्थित होते. अर्थात मुस्लिम धर्मीय धर्म गुरूंची संख्या मोठी होती….. सभा सुरू झाली….. सर्व धर्म गुरू आपापल्या धर्मातील शांतीचा संदेश सांगत होते. संख्या जास्त असल्याने सर्वांना पाच मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. वेळा पाळणे सर्वांनाच आवघड होत होते….

संध्याकाळी 5.00 वाजता अॅड. बाबासाहेब आंबेडकर यांचे मंचावर आगमन झाले. ते आल्यानंतर एक-दोन धर्म गुरूंचा शांती संदेश झाला. नंतर सूत्रसंचालकांनी सांगितले. आता शेवटचा शांती संदेश ह.भ.प. शामसुंदर महराज सोन्नर वारकरी संप्रदायाच्या वतीने देतील आणि नंतर बाळासाहेब आंबेडकर आपले विचार मांडतील. वेळ पाच मिनिटे….. ह.भ.प. शामसुंदर महराज सोन्नर.

……. मी वारकरी संताचे अभंग, ओव्या, पसायदान याचे दाखले देत विचार मांडत होतो…. टाळ्या वाजत होत्या…. मी बोलत राहिलो…. वेळ थोडा वाढला…. एरवी सूत्रसंचालक लगेच चिठ्ठी पाठवायचे…. पण माझा वेळ वाढला तरी चिठ्ठी आली नाही….. मी माझं बोलणं संपवून खाली बसलो…. टाळ्या वाजत होत्या…. दोन-तीन धर्म गुरूंनी जवळ येऊन हस्तांदोलन केले. “बहोत खूब…” च्या प्रतिक्रिया मिळाल्या. बाळासाहेब आंबेडकर साहेब बोलत होते…. अत्यंत मुद्देसूद… तर्कसंगत…. मांडणी त्यांनी केली. सभा संपली…. बाळासाहेब आंबेडकर खाली उतरत असताना गर्दी झाली. मी माझ्या आसनावर बसून होतो…. बाळासाहेब मैदानाबाहेर गेले…. गर्दी कमी झाली. मी खाली उतरलो….. अनेकजण भेटायला पुढे आले. मांडणीचं कौतूक सुरू होतं…. हे सर्व कौतुक खरंतर संत विचारांचं आहे, याची मलाही जाणीव होती… काही लोकल यूट्यूब न्यूज चॅनलला बाईट देण्याची विनंती करीत होते…. मीही तयार झालो…. तेवढ्यात फोन वाजला…..फोन राजगृह येथून होता.

“महाराज पुढचा प्लॅन काय आहे.”

मी म्हणालो, आज मुंबईतच मुक्काम आहे.

“बाळासाहेब तुम्हाला भेटू इच्छितात…. “राजगृह” येथे येऊ शकाल का?”

महामानव, विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जिथे वास्तव्य होते… तिथून आलेले निमंत्रण नाकारण्याचा प्रश्नच नव्हता.

मला पोहचायला ट्रॅफिकमुळे वेळ लागला. तरी अॅड. बाळासाहेब वाट पाहत थांबले होते. मी पोहचताच आपल्या आसनावरून उठून हस्तांदोलन करून स्वागत केले. आपल्या आसनावर न बसता माझ्या बाजूला कोचावर बसून चर्चा केली. वारकरी संत विचारांची अशी मांडणी होणं गरजेचं आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या बोलण्यातून वारकरी संतांविषयी जिव्हाळा व्यक्त होतहोता…. लवकरच एक वारकरी संघटना, फडकरी, शिक्षण संस्था यांच्याशी विचारमंथन करण्यासाठी एखाद्या बैठकीचे आयोजन करावे, अशी विनंती त्यांनी केली.

……. निघालो तेव्हा सोडायला बाळासाहेब दरवाजापर्यंत आले.

संत विचारांनी आणखी काय द्यावं?

 

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या