20.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

मिल्लिया अश्लील व्हिडिओ प्रकरणात जामा मस्जिद येथे मुस्लिम समाजाची बैठक संपन्न,*

प्रतिनिधी –

बीड शहर पोलीस ठाण्यात अश्लील व्हिडिओ प्रकरणात तक्रार अर्ज दाखल

 

बीड / प्रतिनिधी

बीड येथील अंजुमन इशात – ए – तालीम या संस्थेद्वारा संचालक मिल्लिया मुलांची शाळेत कार्यरत असलेल्या व सध्या निलंबित असलेला आमेर रफत काझी व इतर महिला शिक्षकांच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणात काल दि. 8 डिसेंबर शुक्रवार रोजी शहरातील जामा मस्जिद येथे शुक्रवारच्या नमाज नंतर मुस्लिम समाजाची बैठक घेवून अश्लील व्हिडिओ प्रकरणात शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने बीड शहर पोलीस ठाणे येथे कायदेशीर तक्रार अर्ज देण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की,गेल्या दोन – तीन महिन्यापासून मिल्लिया अश्लील व्हिडिओ प्रकरणात मुस्लिम समाजामध्ये संताप पसरला असून या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात असून संस्थाचालकांनी प्रकरणात अद्यापही गुन्हा दाखल का केला नाही ? या सर्व बाबींवर चर्चा करून योग्य ती कायदेशीर पाऊल उचलण्यासाठी शहरातील जामा मस्जिद येथे मुस्लिम समाजाची बैठक संपन्न झाली.

 

या बैठकीत शहरातील अनेक प्रसिद्ध नागरिकांनी अश्लील व्हिडिओ प्रकरणाचा निषेध करत आपले विचार व्यक्त केले यामध्ये मुफ्ती मोहीयोद्दीन खान यांनी नागरिकांशी शांतताप्रिय संभाषण करून त्यांचा रोष आवरला अश्लील व्हिडिओ प्रकरणात आमेर काझी व्हिडिओ तील दुष्कर्म करणाऱ्या इतर अश्लील महिला शिक्षकांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करत नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले.तसेच या बैठकीत माजी सभापती खुर्शीद आलम,माजी नगरसेवक डॉ.इद्रिस हाश्मी,माजी सभापती शकील खान बिल्डर,नगरसेवक सय्यद इकबाल,सय्यद जाहेद,अहेतेशाम शेख,शेख युसुफ,पठाण अमर जान आदींनी अश्लील व्हिडिओ प्रकरणा तीव्र निषेध व्यक्त करत प्रकरणातील सर्व महिला व पुरुष शिक्षकांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी केली.तसेच पठाण मोहम्मद खान यांनी अश्लील व्हिडिओ प्रकरणात रोष व्यक्त करत प्रकरणातील सर्व महिला व पुरुष शिक्षकांची व संस्थाचालकांची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली.

बैठक संपन्न झाल्यानंतर शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी बीड शहरातील सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने बीड शहर पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक चाटे साहेबांना भेटून प्रकरणावर चर्चा करून कायदेशीर तक्रार अर्ज नोंदविण्यात आला.अश्लील व्हिडिओ प्रकरणी लवकरात लवकर कायदेशीर कार्यवाही करून गुन्हे दाखल करण्यात येईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक चाटे साहेबांनी पोलीस ठाण्यात उपस्थित सर्व नागरिकांना दिले यावेळी नगरसेवक जैतुला खान,गुलाम मुबशीर,इर्शाद अन्सारी,अयुब खान,सय्यद रोनाक आली,हमीद खान उर्फ बाबा खान,तबरेज खान,मोमीन समी,जूबेर काजी,पठाण जावेद खान,आसरा रहमद,कामरान खान,इमरान जागीरदार,अजहर खान, शाहबाज खान सह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

वरील बातमी ही आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात यावी ही नम्र विनंती,

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या