20.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

ग्रामीण हद्दीतील उमरद जहाँगिर येथील घरावर जबरी चोरी करणाऱ्या टोळीस स्था.गु.शा.बीड ने केले जेरबंद* बीड पोलिसाची मोठी कारवाई .पि आय संतोष साबळे एक उत्कृष्ट पोलिस अधिकारी.

 

 

*स्थानिक गुन्हे शाखा,बीड कामगिरी*

  • *बीड ग्रामीण हद्दीतील उमरद जहाँगिर येथील घरावर जबरी चोरी करणाऱ्या टोळीस स्था.गु.शा.बीड ने केले जेरबंद*

बीड प्रतिनिधी –

दिनांक 08/10/2023 रोजी रात्री 0100 ते 0130 वा. दरम्यान उमरद जहाँगिर ता.जि.बीड येथील फिर्यादी राम सत्यभान डोळस व्य. शेती यांची राहत्या घरी अज्ञात चार अनोळखी चोरटयांनी त्यांना मददाटी करुन त्यांचे जवळील मोबाईल, सोन्याचे दागिने व साक्षीदारांचे शेळया असा एकूण 145000/- रु चा मुद्येमाल जिवे मारण्याची धमकी देवून जबरीने चोरून नेला होता. सदर गुन्हयाची नोंद पो.ठा.बीड ग्रामीण गुरनं 303/2023 कलम 392,34 अन्वये दिनांक 08/10/2023 रोजी दाखल करण्यात आला आहे.

मा.पोलीस अधीक्षक,बीड यांनी बीड जिल्हयातील उघडकीस न आलेले जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,बीड यांनी आपले अधिपत्याखालील पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन केले आहे.

दिनांक 06/12/2023 रोजी गोपनिय माहिती मिळाली की, उमरद जहाँगिर झालेली जबरी चोरी ही नेवा उर्फ नेव्या आश्रुगा भोसले रा.खोकरमोह ता.शिरुर व त्याचे इतर साथीदाराने केली आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून पोनि स्थागुशा यांनी तात्काळ पोउपनि खटावरकर व स्टाफ यांनी आरोपी शोध घेणेकामी रवाना केले. पथकाने बातमी ठिकाणी जावून शिताफीने नेवा उर्फ नेव्या आश्रुबा भोसले वय 45 वर्षे रा.खोकरमोह यास ताब्यात घेवून गुन्हया अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने त्याचे इतर साथीदार श्रीराम मेंताब भोसले रा.खांडवी ता.गेवराई व इतर दोन अशा एकुण चार जनांनी मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर श्रीराम मेंताब भोसले याची गोपनीय माहिती काढुन त्यास नगरनाका येथून ताब्यात घेण्यात आले इतर दोन फरार आरोपीचा शोध चालु आहे. गुन्हा स्थागुशा बीड ने उघडकीस आणला असून दोन आरोपींना पो.ठा.बीड ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आलेले आहेत. उर्वरित दोन फरार आरोपींचा शोध स्थागुशा व पोलीस स्टेशन बीड करीत आहेत. आरोपीतांकडुन इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी ही मा.श्री.नंदकुमार ठाकुर पोलीस अधीक्षक बीड, मा.श्री. सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक,बीड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संतोष साबळे पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.बीड, पोउपनि श्रीराम खटावकर, पोह/मनोज वाघ,प्रसाद कदम, सोमनाथ गायकवाड, विकास वाघमारे, गणेश हांगे, अलिम शेख, सचिन आंधळे, अश्विनकुमार सुरवसे, चालक अशोक कदम यांनी केली आहे.

 

 

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या