-1.2 C
New York
Saturday, February 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

माजलगाव केज रस्त्यावरील काटेरी झाडे तत्काळ काढा अन्यथा एमएसआरडी विभागा समोर आंदोलन करू किसान सभेचे अँड.अशोक डाके यांचा इशारा

राष्ट्रीय महामार्गावरील काटेरी झाडे ठरत आहेत अपघाताला निमंत्रण

 

माजलगाव केज रस्त्यावरील काटेरी झाडे तत्काळ काढा अन्यथा एमएसआरडी विभागा समोर आंदोलन करू किसान सभेचे अँड.अशोक डाके यांचा इशारा

 

 

 

माजलगाव (प्रतिनिधी)

 

 

शेगाव- पंढरपूर सिमेंट महामार्गाला तडे गेले असून या महामार्गाच्या दोन्ही बाजूने काटेरी झाडे मोठ्या प्रमाणात वाढली असुन रस्त्यावर झोके घेत असल्याने मोठी आडचण निर्माण झाली आहे.यामुळे ही बाभळीची काटेरी झाडे मोठ्या प्रमाणात अपघातांना निमंत्रण ठरत आहेत.अनेक अपघातही या रस्त्यावर होत असून तात्काळ या महामार्गावरील काटेरी झाडे काढावीत अशी मागणी किसान सभेचे अँड.अशोक डाके यांनी केली आहे.या रस्त्याचे काम नियमाप्रमाणे केलेले नसुन या सिमेंट रस्त्याला मोठे तडे गेले आहेत.

 

शेगाव- पंढरपूर सिमेंट महामार्गाला तडे गेले असून काम नियमाप्रमाणे झालेले नाही तर आता.शेगाव -पंढरपूर या दिंडी मार्गाच्या दोन्ही बाजूने माजलगाव ते नित्रुड व तेलगाव ते धारूर,केज या रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ मोठी काटेरी झाडे मोठी झाली असून ही झाडे महामार्गाच्या दोन्ही बाजूने दुचाकी स्वरांच्या रस्त्यावर लोमकळत आहेत यामुळे या रसाच्या दोन्ही बाजूने या रस्त्याला पांदण रस्त्याचे स्वरूप आले आहे यामुळे या रस्त्याला मोठा अडथळा निर्माण झाल्याने दुचाकी स्वरांना या रस्त्यावरून चालणेही अवघड झाले आहे. या मोठ्या झाडांच्या अवघळयामुळे मोठ्या वाहनांची अपघात ही दुचाकी स्वरासोबत घडत आहेत.याकडे तत्काळ दिलीप बिल्डकॉन व एमएस आरडी विभागाने लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा किसान सभेचे अँड.अशोक डाके यांनी प्रसिध्दी पत्राव्दारे दिला आहे.

या महामार्गाचे काम मागील काही वर्षात करण्यात आले आहे.दिलीप बिल्डकॉन या कंपनीने या रस्त्याचे काम केलेआहे. मात्र या कामावर

एमएसआरडी विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे.👇🙏

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या