लहुजी शक्ती सेनेने अंबाजोगाई बीड महामार्ग रोखला
कोरेगाव फाटा येथे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन
अनुसूचित जाती आरक्षणामध्ये अ,ब,क,ड वर्गीकरण करा तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा,बार्टीच्या धर्तीवर आर्टी या शैक्षणिक संस्थेची स्थापना करा या सह इतर प्रमुख मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे हे गेली 16 नोव्हेंबर पासून पुणे ते नागपूर आरक्षण क्रांती पायी पदयात्रेच्या माध्यमातून नागपूरच्या दिशेने चालत निघालेले आहेत सदर पदयात्रेचा आजचा बावीसावा दिवस उजाडला तरी देखील महाराष्ट्र सरकारने पदयात्रेची कसलीही दखल घेतली नाही किंवा पदयात्रा थांबवण्यासाठी कुठलीही कारवाई केलेली नाही, वीस दिवसाच्या पायी प्रवासामुळे विष्णूभाऊ कसबे यांच्या पायाला जखमा होऊन त्यामधून रक्त येत असून त्यांची तब्येत खालावलेली आहे,शासनाच्या या डोळेझाक कृतीचा निषेध करण्यासाठी आज आंबेजोगाई-बीड महामार्गावरील मौजे कोरेगाव फाटा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला अर्धा तास चाललेल्या रस्ता रोको मुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना यावेळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या सदर रास्ता रोको आंदोलन लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गालफाडे यांच्या नेतृत्वामध्ये व प्रदेश महासचिव बालाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी बीड जिल्हाध्यक्ष नाना भिसे मराठवाडा संघटक राजेश कांबळे,गणेश गायकवाड,नानाभाऊ पाटोळे,लहू कसबे,अशोक कसबे, ऋषिकेश शिरसागर, कारके भाऊ, रंजीत पाटोळे,आदित्य मोठे, पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते