*चनकवाडी वॉटर फिल्टर बंद चालु करा*
*गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन*
प्रतिनिधी – मौजे चनकवाडी ता.पैठण या गावामध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी चांगले मिळावे यासाठी वाटर फिल्टर बसविण्यात आले, परंतु वॉटर फिल्टर फक्त शोभेची वास्तू बनली आहे. याकडे ग्रामपंचायत चे पुर्णतः दुर्लक्ष असून वेळोवेळी तोंडी अर्ज करूनही काहीच उपयोग होत नाही. यामुळे नाईलाजाने दूषित पाणी पिल्याने गावात आजारी पडणारे ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याबरोबर दलित वस्तीमधील पाईपलाईन बंद असून फक्त लिकेज च्या नावाखाली चाल ढकल ग्रामपंचायत करत आहे. एकीकडे डेंगू च्या साथीने थैमान घातले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वॉटर फिल्टर व दलितवस्ती बंद पाईपलाईन याबाबत ग्रामपंचायत चनकवाडी यांना आदेशित करावे नसता येत्या सात दिवसात आपल्या कार्यालय समोर ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल,असे आशायचे निवेदन दिले आहे.
यावेळी उपस्थित गोविंद बावणे,कार्तिक बावणे,स्वप्नील बोठे,विनोद ससाने,पुष्कर बावणे,शुभम कदम आदी ग्रामस्थ होते.