23.1 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

आज दि.7 डिसेंबर 2023 रोजी मुर्तीजापुर तालुका तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले व ठाणेदार साहेब,पोलीस स्टेशन मुर्तिजापूर शहर यांना निवेदन देण्यात आले आहे,

आज दि.7 डिसेंबर 2023 रोजी मुर्तीजापुर तालुका तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले व ठाणेदार साहेब,पोलीस स्टेशन मुर्तिजापूर शहर यांना निवेदन देण्यात आले आहे,

प्रतिनिधी –

भारतिय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हयांची विटंबना केली व जाणुनबुजन महापुरषाचा अपमान केला याबद्दल जातीवादी समाजकंटक रविकुमार रमेशचंद्र राठी यांचेवर २९५, २२१ अंतर्गत समजाच्या भावना दुखावल्या बद्दल गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे आमची सर्व बौध्द समजाच्या वतीने मागणी.

मा. महोदय,

दि.२८/११/२०२३ रोजी अंदाजे १२ वाजता अशोक वाटीका अकोला येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयांना हेतुपुरस्सर दोन समाजामध्ये तेढ निर्माण व्हाव,जातीय दंगल व्हावी हया कारणाने एक समाजकंटक नामे रविकुमार रमेशचंद्र राठी हा व त्याच्यासोबत काही जणांनी दारूचे नशा करून दारूच्या नशेत बेधुंद अवस्थेत मध्ये पायामध्ये चप्पल बूट घालून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतल्याला, हार घालत होता.त्यावेळेस अशोक वाटीकेतील लोकांनी त्यांना हटकले असता गैरअर्जदाराने तेथील नागरीकांसोबत अरेरावीची भाषा बोलुन त्यांना तेथुन हुसकावून,लावले सदर व्यक्ती हा मुर्तिजापूर तालुक्यातील रहिवाशी असल्याचे आम्हाला समजले आहे.वरील गैरअर्जदाराने आम्ही महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याला बुट घालून हार अर्पण संपुर्ण बौध्द समाजाच्या धार्मिक भावना दुखाविलेल्या आहेत त्यामुळे समाजामध्ये गैरअर्जदारा विरुध्द असंतोषाचे भावना निर्माण झाल्या आहेत.वरील गैरअर्जदाराने केलेले कृत्य अतिशय गंभीर स्वरुपाचे असून त्यामुळे संपूर्ण बौध्द समाजाच्या मनाला वरील कृत्यामुळे ठेच पोहचली आहे. गैरअर्जदार समाजकंटक हा जातीवादी असून त्याने जे केले आहे ते समाजामध्ये तेढ निर्माण करण्याकरीता आहे. तसेच संबंधीत कृत्यामुळे जातीय दंगल ची शक्यता नाकारता येत नाही.तसेच वरील गैरअर्जदाराने त्याचे बुटासहीत महामानव डॉ.बाबासाहेब यांना हार अर्पण करण्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झालेले आहेत त्यामुळे वरील गैरअर्जदारावर योग्य ती कारवाई करुन त्याच्यावर भा.द.वि.२९५, तसेच आय.टी.नुसार गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा निळं वादळ उठल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो,, सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य,,#SamratAshokSena*

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या