25.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

*अनुसूचित जाती अभ्यास आयोगाची स्थापना कधी करणार ? :– सुरेशचंद्र राजहंस.*

*अनुसूचित जाती अभ्यास आयोगाची स्थापना कधी करणार ? :– सुरेशचंद्र राजहंस.*

*अभ्यास समितीची स्थापना व अभ्यास दौरे ही मातंग समाजाची निव्वळ दिशाभूल.*

मुंबई, दि. ८ डिसेंबर
आरक्षणाचा लाभ सर्व जातींना व्हावा यासाठी आरक्षणाचे अबकड वर्गीकरण करण्याची मागणी मातंग व तत्सम समाज सातत्याने करत आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार मात्र मातंग समाजाच्या या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. अभ्यास दौरे करणे किंवा अभ्यास समितीची स्थापना करणे ही मातंग समाजाची दिशाभूल आहे. आरक्षण वर्गीकरणासाठी आवश्यक असलेल्या अनुसूचित जाती अभ्यास आयोगाची स्थापना करणे महत्वाचे आहे सरकार ते कधी करणार ? ते स्पष्ट करावे, अशी मागणी आरक्षण वर्गीकरण आंदोलनाचे नेते व काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.

मातंग समाजाच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे २५ मार्च २०२३ रोजी यासंदर्भात एक बैठक झाली, त्यावेळी एक महिन्याच्या आत वेगवेगळ्या राज्याचा अभ्यास दौरा करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते आज ९ महिन्यानंतरही सरकार केवळ अभ्यास दौरेच करत आहेत. सरकारचे हे वेळकाढू धोरण असून मातंग समाजाची घोर फसवणूक केली जात आहे. सरकारच्या या वेळकाढू धोरणामुळे मातंग समाजात भाजपा सरकारविरोधात तीव्र नाराजी आहे. वारंवार लक्षात आणून देऊनही सरकार मुख्य विषयापासून दूर जात आहे.

भारत भ्रमण करून अभ्यास केला तरीही अनुसूचित जाती अभ्यास आयोग गठीत केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अभ्यास गटाच्या नावाखाली केवळ पर्यटन सुरु असून या अभ्यास दौऱ्यांचा खर्चही लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या पैशातूनच केला जात आहे. त्यामुळे या अभ्यास समितीचा संपूर्ण खर्च राज्यशासनाने बार्टी किंवा सामाजिक न्याय विभागातून करावा. राज्यातील इतर समाज आरक्षणाची मागणी करत असताना त्यांच्या मागण्यांवर सरकार तातडीने हालचाली करत आहे मग मातंग समाजाच्या मागण्यांसाठीच भाजपा सरकारकडे वेळ नाही का? सरकारने मातंग समाजाचा अंत पाहू नये. तातडीने अनुसूचित जाती अभ्यास आयोगाची स्थापना करून मातंग समाजाला न्याय द्यावा, असे सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे.
#SureshchandraRajhans #Congress
#मातंगसमाज #MatangSamaj #आरक्षण #वर्गीकरण
#News #BreakingNews #PressRelease
Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Shambhuraj Desai Nana Patole Ashok Chavan Balasaheb Thorat Varsha Gaikwad Atul Londhe Indian National Congress – Maharashtra Lokmat Sakal Maharashtra Times Loksatta Pudhari

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या