गेवराई : शहरातील एका जिनिंगला लक्ष करून, भिंतीला अलगद भगदाड पाडून 25 क्विंटल कापूस चोरट्यांनी लांबविला असून, या घटनेने कापूस व्यापारपेठेत खळबळ उडाली आहे. घटना सोमवारी ता. 4 रोजी मध्यरात्री घडली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून काही शेतकऱ्यांचा कापूस चोरीला गेल्याच्या घटना घडत आहेत.
पोलीसांनी घटनेच पंचनामा करून तक्रार दाखल करून घेतल्याची माहिती आहे. गेवराई शहरा पासून जवळच असलेल्या गेवराई- बीड रोडवर गिरिजा शंकर कॉटन जिनिंग आहे. या जिनिंगला संरक्षण भित असून, जिनिंग परिसरात हजारो क्विंटल कापूस खरेदी करण्यात आलेला आहे. सोमवार ता. 4 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरटय़ांनी जिनिंग च्या भिंतीला अंदाजे पाच – सहा फुटाचे अलगद भगदाड पाडून, जिनिंग मध्ये असलेल्या कापसातून जवळपास 25 क्विंटल कापूस लांबविला आहे. कापूस चोरी गेल्याची घटना सकाळी उघडकीस आली.
या घटनेने व्यापारपेठेत खळबळ उडाली असून, कापूस जिनिंग संचालक धास्तावले आहेत. पोलीसात तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, चोरीच्या घटना वाढल्या असून, गेवराई पोलिसांनी घटनेचा छटा लावावा अशी मागणी होऊ लागली आहे.
<